मोठी बातमी! CID फेम फ्रेड्रिक्सला हृदयविकाराचा झटका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | CID फेम दिनेश फडनिस यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिनेश यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. दयानंद शेट्टी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. दयानंद शेट्टी यांनी सीआयडी या मालिकेत दयाची भूमिका साकारली होती.

दिनेश यांना हृदयविकाराचा झटका आल्याने चाहतेही हैरान झाले आहेत. चाहतेही दिनेश यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश यांना हृदयविकाराचा झटका

मुंबईच्या तुंगा रुग्णालयात अभिनेत्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दिनेश फडनिस  सध्या व्हेंटिलेटरवर असून जीवन-मरणाशी झुंज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

चाहत्यांसह सेलिब्रिटी चिंतेत

अभिनेत्याच्या प्रकृतीची माहिती मिळताच चाहत्यांसह सेलिब्रिटींना देखील धक्का बसला आहे. सीआयडी शोमधील स्टार कास्ट दिनेश याची विचरपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. अभिनेत्याच्या प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी चाहते, सेलिब्रिटी आणि कुटुंबिय प्रार्थना करत आहेत. वयाच्या 57 व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

‘सीआयडी’ (CID) हा नव्वदच्या दशकातील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आजही या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ आहे. या कार्यक्रमातील सर्वच पात्र सुपरहिट ठरले आहेत. या कार्यक्रमात दिनेश फडनिस यांनी इंस्फेक्टरची भूमिका साकारली होती.

Fredericks of CID fame suffers a heart attack

महत्त्वाच्या बातम्या- 

Assembly Election Results 2023 | ‘या’ राज्यांमध्ये भाजप सुसाट, काँग्रेसला मोठा धक्का

Neena Gupta | ‘महिलांनी फक्त पतीला…’ नीना गुप्ता यांचं पु्न्हा खळबळजनक वक्तव्य

Anna Idli | पुण्यात अण्णा नावावरुन पेटला वाद!, कोर्टानं दिला महत्त्वाचा आदेश

Petrol Diesel Price | लवकरच पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार!, सर्वात मोठं कारण आलं समोर

Leopard Cubs | धक्कादायक!!! मांजरीची पिल्लं म्हणून चुकून आणली बिबट्याची पिल्लं… पुढे घडली थरारक घटना