Neena Gupta | ‘महिलांनी फक्त पतीला…’ नीना गुप्ता यांचं पु्न्हा खळबळजनक वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Neena Gupta | बाॅलिवूडमध्ये अनेक डॅशिंग अभिनेत्री आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नीना गुप्ता (Neena Gupta). अलिकडे नीना गुप्ता यांनी वक्तव्य केलं होतं ज्याची सर्वत्र चर्चा सुरु होती. मात्र, आता पुन्हा एकदा गुप्ता यांनी एक वक्तव्य केलं ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नीना गुप्ता यांनी कोणतं वक्तव्य केलं?

बॉलिवूडमधली धाडसी अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांची ओळख आहे. मात्र, त्यांनी एका मुलाखतीत पूर्वीच्या आणि आताच्या महिलांमधील फरक सांगितला आहे. बोलत असताना त्या म्हणाल्या की, पूर्वीच्या महिला आणि आताच्या महिला यांचं आयुष्य फार वेगळं आहे. सध्याच्या महिला या त्यांच्या पायावर उभ्या आहेत त्यामुळे स्वतःचे निर्णय ते स्वतः घेतात.

पुढे त्या म्हणाल्या की, आजच्या काळात काही महिला या नको असलेल्या नात्यात अडकून रहातात. पण त्यांच्याकडे नात्यातून बाहेर येण्याचा कोणताही मार्ग नाही. प्रत्येक रोमाँटिक रिलेशनशिपची सुरुवात वासनेने सुरु होते. नोकरी, बुद्धीमत्ता, हुशारी इत्यादी गोष्टींमुळे तुम्ही आकर्षित होता. पण बायोलॉजीलक रिलेशनशिपमध्ये वासना असतेच. नीना गुप्ता यांनी केलेल्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे.

Neena Gupta काय म्हणाल्या?

नीना गुप्ता म्हणाल्या की, आमच्या पिढीत लोकांना फार काय शारीरिक संबंधांचं फ्याड नव्हतं. शिवाय महिला देखील आपल्या पतीला संतुष्ट करु शकत होत्या. आमच्या अनंदाचा कोणी कधीच विचार केला नाही. आमच्या आनंदाला प्राधान्य द्यायला शिकवलं नाही. महिलांनी फक्त पतीला आनंदी ठेवायला पाहिजे.

नात्यात रोमान्स नव्हता-

आजकालच्या महिलांना नात्यात रोमान्स लागतो. मात्र, आमच्या काळात असं नव्हतं कारण तेव्हा महिलांना आपल्या पतीकडे रोमान्स मागायला परवानगी नव्हती. माझ्या काळात फक्त आपल्या मुलांचा विचार करुन महिला जगायच्या. हेच चक्र कित्येक वर्ष सुरु होतं. महिलांना कायम स्वतःचं मन मारुन जगावं लागत होतं. घटस्फोट तर तेव्हा फार दूरची गोष्ट होती.

News Title : neena gupta Sensational statement

थोडक्यात बातम्या-

Petrol Diesel Price | लवकरच पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार!, सर्वात मोठं कारण आलं समोर

Leopard Cubs | धक्कादायक!!! मांजरीची पिल्लं म्हणून चुकून आणली बिबट्याची पिल्लं… पुढे घडली थरारक घटना

Weather Update | नव्या वादळाची एन्ट्री, महाराष्ट्राच्या ‘या’ भागांवर मोठं संकट

Gold Price Today | सोन्याचे दर भिडले गगनाला, पाहा किती रुपयांची झाली वाढ

Government Strike | ‘या’ कारणामुळे राज्यातील 17 लाख कर्मचारी संपावर!