Petrol Diesel Price | लवकरच पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार!, सर्वात मोठं कारण आलं समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Petrol Diesel Price | नुकत्याच 5 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकांपूर्वी पाचही राज्यात सर्वच पक्षांकडून जंगी प्रचार करण्यात आला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर या राज्यांमधील बहुतांश भागात गॅस सिलेंडरचे भाव देखील कमी करण्यात आले होते. या राज्यांनंतर आता लोकसभा निवडणूक होणार आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे, तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

महत्त्वाची बातमी कोणती?

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, येणाऱ्या नव्या वर्षात म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सरकारने एक महत्त्वाची भूमिका घेतली आहे. ज्यामध्ये देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कमी होऊ शकतात. कारण भारताने तब्बल 3 वर्षांनंतर एक मोठं पाऊल उचललं आहे, ज्यामुळे देशाला कच्चे तेल स्वस्त मिळणार आहे.

या मागे नेमकं कारण काय?

दरम्यान, व्हेनेन्झुएलाने (Venezuela) अमेरिकेवर लादलेले काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे भारतातील पेट्रोलियम रिफायनरींनी (Petroleum Refineries India) पुन्हा एकदा व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली आहे. याचा फायदा चीनलाही होणार आहे. तेथील बहुतांश कंपन्यांनी मध्यस्थांच्या मदतीने कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीज एक महत्त्वाचा करार करणार असल्याची माहिती आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने कोणता करार केला?

देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम रिफायनरीची मालक असलेली रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) या संदर्भात व्हेनेझुएलाशी थेट एक करार करण्याची शक्यता आहे. येत्या आठवडाभरात कंपनीचे अधिकारी व्हेनेन्झुएलाच्या सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं माध्यमांकडून समजलं.

कंपनीने सध्या व्हेनेन्झुएला येथून 3 कच्च्या तेलाचे टँकर बुक केले आहेत. ते तेथून डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 मध्ये भारताला रवाना होतील. 2019 मध्ये अमेरिकेने व्हेनेन्झुएलावर निर्बंध लादण्यापूर्वीच, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नायरा एनर्जी लिमिटेड नियमितपणे व्हेनेन्झुएलातून कच्चे तेल आयात करत होते. कमोडिटी मार्केट अॅनालिटिक्स फर्म कॅप्लरच्या मते, व्हेनेन्झुएलाचे कच्चे तेल नोव्हेंबर 2020 मध्ये भारतात आले होते. त्यामुळे पुढील 6 महिन्यात तेलाचे दर (Petrol Diesel Price) स्वस्त होतील,अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 6 महिन्यांनी का तेल स्वस्त होणार?

व्हेनेन्झुएला हा भारताला कच्च्या तेलाची निर्यात करणारा पाचवा सर्वात मोठा देश आहे. या देशात जगातील सर्वात मोठे कच्च्या तेलाचे साठे आहेत. तेथून तेल आयात करणे भारतासाठी स्वस्त सुद्धा आहे. अमेरिकेने व्हेनेन्झुएलाला दिलेल्या सवलतीमुळे या देशाला पुढील 6 महिने मुक्तपणे आणि मर्यादेशिवाय कच्च्या तेलाची निर्यात करता येणार आहे.

News Title : petrol diesel price in India will be cheaper

थोडक्यात बातम्या –

Leopard Cubs | धक्कादायक!!! मांजरीची पिल्लं म्हणून चुकून आणली बिबट्याची पिल्लं… पुढे घडली थरारक घटना

Weather Update | नव्या वादळाची एन्ट्री, महाराष्ट्राच्या ‘या’ भागांवर मोठं संकट

Gold Price Today | सोन्याचे दर भिडले गगनाला, पाहा किती रुपयांची झाली वाढ

Government Strike | ‘या’ कारणामुळे राज्यातील 17 लाख कर्मचारी संपावर!

MLA disqualification | मोठी बातमी! आमदार अपात्र प्रकरणात नवा ट्विस्ट