Congress | काँग्रेसने उचललं मोठं पाऊल; महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्यावर मोठी जबाबदारी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

हैद्राबाद | तेलंगणामध्ये काँग्रेस (Congress) सत्तेवर येण्याचा काँग्रेसच्या नेत्यांना विश्वास असल्याने निकालापूर्वीच सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

काँग्रेसने (Congress) सत्तास्थापनेची तयारी सुरु केली आहे आणि अशातच आता तेलंगणाच्या सत्तास्थापनेची धुरा महाराष्ट्रातील बड्या नेत्यावर टाकण्यात येण्याची शक्यता आहे. तेलंगणातील सत्तास्थापनेची जबाबदारी माजी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर दिली जाण्याची शक्यता आहे.

अनुभवी नेते म्हणून कर्नाटक नंतर तेलंगणातील सत्ता स्थापनेची जबाबदारी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

“एकतर्फी बहुमताने आम्ही विजयी होऊ”

आमदार पळवापळवीचा प्रकार तेलंगणामध्ये होण्याचा प्रश्नच येत नाही. एकतर्फी बहुमताने आम्ही विजयी होऊ. हा तेलंगणाच्या जनतेचा विजय असेल, असा दावा तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

तेलंगणामध्ये काँग्रेस 70 पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल. मुख्यमंत्री केसीआर यांनी राजेशाही असल्याप्रमाणे फार्महाऊसवरून सरकार चालवलं. दहा वर्षात 10 वेळाही केसीआर मंत्रालयात आले नाहीत. दहा वर्षात कोणतेही काम केलं नाही. याचा जनतेमध्ये रोष आहे. तो या निकालातून दिसणार आहे, असं ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-