Ajit Pawar | ‘मला अमित शहांनी…’; निकालानंतर अजित पवारांचा मोठा खुलासा

मुंबई | चार राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागण्याआधी एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) फक्त राजस्थानमध्येच भाजपला यश मिळणार तर काँग्रेसला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता राखण्यात यश मिळणार असल्याचा अंदाज होता. पण तेलंगणा सोडलं तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थामध्ये भाजपने (Bjp) विजयाचा गुलाल उधळला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर Assembly Election 2023) आता राज्यभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. निकालाबाबत अमित शहा आणि त्यांच्या भेटीचा संदर्भ देत महत्त्वाची माहिती दिलीये.

“मोदी 24 तासांमधील 15ते 16 तास काम करतात”

मोदी 24 तासांमधील 15ते 16 तास काम करतात. आपल्या घरी त्यांनी कधी दिवाळी साजरी केली नाही. सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात, परदेश दौरा करून आल्यावरही ते कधी आराम न करता पूढच्या कामाला लागतात. भाजपचा मोदी हा एकमेव चेहरा असून प्रत्येकाने जो निकाल आहे तो मान्य केला पाहिजे, टअसं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

मी मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेलो होतो, त्यावेळीच त्यांनी निकाल चांगला लागेल असं सांगितलं होतं. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडही येईल. माझं स्पष्ट मत आहे की, काहींनी नको तेवढा आत्मविश्वास दाखवला, असं अजित पवारांनी सांगितलं.

मोदींच्या नेतृत्त्वात देशाची प्रतिमा उंचावली. मोदींच्या नेतृत्त्वात देशाचा विकास होत आहे. जागतिक पातळीवर भारताचा नावलौकिक वाढला आहे, असं सांगत अजित पवारांनी मोदींचं कौतुक केलंय.

युक्रेनममध्ये युद्धा थांबवून आपल्या लोकांना आणलं होतं. त्यांनी आपले कॉन्टॅक्ट वाढवले असून मोदींनी हायवे, रेल्वेचं जाळ, विमानतळ आणि गुंतवणक वाढवण्यासाठीच्या गोष्टी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं अजित पवार म्हणाले.

Big revelation of Ajit Pawar after the result

महत्त्वाच्या बातम्या- 

Assembly Election Result 2023 | तेलंगणामध्ये काँग्रेसच्या विजयाचा भाजपला फायदा?

मोदी होणार प्रसन्न?, Diya Kumari यांच्याकडे राजस्थानचं मुख्यमंत्रिपद???

Assembly Election result 2023 | निकालाआधीच काँग्रेस सावध; आमदारांना ठेवणार ‘या’ ठिकाणी

Congress | काँग्रेसने उचललं मोठं पाऊल; महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्यावर मोठी जबाबदारी

मोठी बातमी! CID फेम फ्रेड्रिक्सला हृदयविकाराचा झटका