Taimur Ali Khan | लेकानं केलेल्या ‘या’ कामगिरीनं सैफ अली आणि करिनाला आभाळ ठेगणं

Taimur Ali Khan | बाॅलिवडूची बेबो म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर कायम आपल्या मादक अदांनी चर्चेत असते. शिवाय आपल्या उत्तम अभिनयामुळे तिने अनेकांच्या मनात घर केलं आहे. फिटनेसमध्ये सुद्धा अजिबात ती मागे नाहीये, आपल्या चाहत्यांसाठी करीना कायम अधिकृत अकाउंटवरुन फोटोज शेअर करत असते.

दरम्यान, करीनासोबतच तिचे दोन अनमोल रत्न सुद्धा पापारीजासमोर झळकत असतात. करीना (Kareena Kapoor) आपल्या लाडक्या मुलांचा नौटंकीपणा सुद्धा आपल्या चाहत्यांसाठी इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करत असते. अशातच करीनाचा लेक तैमूर अली खानची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

तैमुरची का होतेय चर्चा?

तैमूर अली खान याला थेट गोल्ड मेडल मिळाल्याने चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे तैमूर अली खान (Taimur Ali Khan) याला हे गोल्ड मेडल तायक्वोंदोमध्ये मिळालं आहे. इतक्या कमी वयामध्ये थेट गोल्ड मेडल तैमूर अली खान याने मिळवले, त्यामुळे तैमुरचं कौतुक होताना दिसत आहे. नुकतीच तायक्वोंदोची एक स्पर्धा ही पार पडली. या स्पर्धेमध्ये इतरही अनेक स्टारची मुलं सहभागी झाली होती. यामध्ये तैमूर अली खान याने धमाकाच केला. आता या स्पर्धेतील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनूसार, तैमूर अली खान (Taimur Ali Khan) याच्याकडे तायक्वोंदोचा येलो बेल्ट आहे. तैमूरला गोल्ड मेडल मिळाल्यानंतर आई करीना कपूर खान ही आनंदी झाली आहे. लेकाला सपोर्ट करण्यासाठी करीना कपूर खान ही स्पर्धा पाहण्यासाठी पोहोचली होती.

करिना सोबत काजोलची उपस्थिती

फक्त करीना कपूर खान हीच नाही तर यावेळी अभिनेत्री काजोल देखील उपस्थित होती. तायक्वोंदोच्या या स्पर्धेमध्ये सर्वांना हरवत तैमूर अली खान याने थेट गोल्ड मेडल मिळवले. तैमूर अली खान सुरूवातीपासूनच चर्चेत असलेले नाव आहे. विशेषतः तैमूर अली खान हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो. काही जणांना त्याला शिव्या द्यायला आवडतात. असे लोक फारच नालायक वृत्तीचे असतात. अशा लोकांची तोंडं हाणली पाहिजेत.

News Title : taimur ali khan has great achievement

थोडक्यात बातम्या-

Ajit Pawar | ‘मला अमित शहांनी…’; निकालानंतर अजित पवारांचा मोठा खुलासा

Assembly Election Result 2023 | तेलंगणामध्ये काँग्रेसच्या विजयाचा भाजपला फायदा?

मोदी होणार प्रसन्न?, Diya Kumari यांच्याकडे राजस्थानचं मुख्यमंत्रिपद???

Assembly Election result 2023 | निकालाआधीच काँग्रेस सावध; आमदारांना ठेवणार ‘या’ ठिकाणी

Congress | काँग्रेसने उचललं मोठं पाऊल; महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्यावर मोठी जबाबदारी