Telangana Election 2023 | सर्वात मोठी बातमी: तेलंगणात तत्कालीन मुख्यमंत्र्यासह भावी मुख्यमंत्र्याचाही पराभव

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Telangana Election 2023 | तेलंगणामध्ये (Telangana) विजयानंतर काँग्रेस राज्यात सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष रेवंत रेड्डी विजयाचे नायक ठरले आहेत तर भाजपचे कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी नवे बाहुबली. भाजपच्या या उमेदवाराने तेलंगणाचे (Telangana) विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या बरोबरच भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू असलेले रेवंत रेड्‌डी यांनाही पराभूत केलंय.

कटिपल्ली वेंकट रमण रेड्डीयांच्या विजयावर केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजूयांनी सोशल मीडिया एक्सवर त्यांचाफोटो पोस्ट करत लिहिलं आहे की, या ग्रेटमॅनच्या विजयाची चर्चा झाली पाहिजे.

कोण आहेत कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी?

भाजपचे उमेदवार कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी हे व्यावसायिक आहेत. भाजपच्या कटिपल्ली वेंकट रमनायांनी कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार रेवंत रेड्डी दोघांना पराभूत केलं. हा एक मोठा विजय आहे, ज्याची पाहिजे तितकी चर्चा होताना दिसत नाही.

रेवंत रेड्डी यांच्यामुळे भाजप विजय?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी केसीआर यांना आव्हान देण्यासाठी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. ते तिसऱ्या स्थानावर असून त्यांना 54,916मते मिळाली आहेत. रेवंत रेड्डी यांच्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा विजय सोपा झाला, हे स्पष्ट दिसत आहे. रेवंत रेड्डी कामारेड्डी आणि कोडंगल या दोन मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. कोडंगल या त्यांच्या परंपरागत मतदारसंघात त्यांनी एकहाती विजय मिळविला आहे.

दरम्यान,  कामारेड्डी मतदारसंघात मतमोजणीच्या  20 फेऱ्या पूर्ण झाल्या असून त्यात भाजपाच्या वेकंट रमण रेड्डी यांनी 666,52 मते घेतली आहेत. दुसऱ्या क्रमाकांवर मुख्यमंत्री केसीआर असून त्यांनी 59,911 मते घेतली आहेत. दोघांच्या मतांमध्ये 6741 मतांचे अंतर आहे. त्यामुळे रमण रेड्डी यांची आघाडी कायम असून त्यांना विजयी घोषित केलं आहे.

भाजपने तेलंगणामध्ये विजय मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांसारख्या नेत्यांनी तेलंगणात प्रचार केला होता. मात्र, भाजपला या ठिकाणी फारसं यश मिळालं नाही.

Defeat of the then Chief Minister as well as the future Chief Minister in Telangana

महत्त्वाच्या बातम्या-