Weather Update | पुढच्या वर्षी देखील पाऊस नाही?, हवामान विभागाचा मोठा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्याच्या अनेक भागात पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यंदा मान्सूनमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने मराठवाड्यासह काही भागात दुष्काळग्रस्तस्थिती पहायला मिळत आहे. त्यामुळे काही भागात पिकांना पाहिजे तसं पाणी सुद्धा मिळालं नाही.

दरम्यान, नोव्हेंबरमध्ये पडलेल्या पावसामुळे (Weather Update) राज्यातील काही भागात पिकांना मोठा फटका बसला आहे. द्राक्षांच्या बागासह अनेक पिकांची नासधूस झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने (Department Of Meterology) शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

हवामान विभागाने काय माहिती दिली?-

सध्या राज्यभरात सुरु असलेल्या अवकाळी पावसाने राज्याभरात धुमाकुळ घातला आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्याच्या काही ठिकाणी पाbसाने हजेरी लावली असली, तरी काही पिकांचं नुकसान केलं आहे. यासोबतच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झालं आहे, यामुळे नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग चक्रिवादळ’ (Michaung Cyclone) आलं आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे.

मिचौंग वादाळानंतर आता एक नवं संकट येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पुढील वर्षी देखील हवामानात मोठे चढउतार होण्याची शक्यता आहे. इतर देशांच्या तुलनेत एल-निनोचा परिणाम सर्वात जास्त भारतावर होताना दिसतो. यामुळे राज्याच्या काही भागात थंडीवर देखील परिणाम होणार आहे.

Weather Update: एल-निनोचा परिणाम-

एल निनो मान्सूनपूर्व हंगामात जोरदारपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाला अडथळा होईल. उत्पादन मोठ्या प्रमाणात घटेल. 2024 चा खरीप व रब्बी हंगाम 2023 पेक्षाही अतिशय खडतर असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यंदाच्या डिसेंबरमध्ये थंडी देखील आता जेमतेम राहण्याचा अंदाज आहे.

News Title : no rainfall in upcoming year

थोडक्यात बातम्या-

Pune Crime | पैशांचा पाऊस पाडण्यासाठी सुरु होती पूजा, तेवढ्यात… पुण्यात धक्कादायक प्रकार

Weather Update | मिचौंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात काय होणार?, हवामान विभागाचा मोठा इशारा

Telangana Election 2023 | सर्वात मोठी बातमी: तेलंगणात तत्कालीन मुख्यमंत्र्यासह भावी मुख्यमंत्र्याचाही पराभव

Taimur Ali Khan | लेकानं केलेल्या ‘या’ कामगिरीनं सैफ अली आणि करिनाला आभाळ ठेगणं

Ajit Pawar | ‘मला अमित शहांनी…’; निकालानंतर अजित पवारांचा मोठा खुलासा