Bollywood News | ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता मृत्यूच्या दारात, सिनेसृष्टीत एकच खळबळ

Bollywood News | प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर महमूद सध्या मृत्यूच्या दारात आहेत. महमूद गेल्या दोन महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत आहेत. शिवाय महमूदबद्दल डाॅक्टरांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्यामुळे इंडस्ट्रीतील (Bollywood News) अनेक दिग्गज कलाकार त्यांना भेटण्यासाठी जात आहेत.

महमूद यांच्याबद्दल डाॅक्टर काय म्हणाले ?

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर महमूद यांच्या प्रकृतीबाबात डाॅक्टरांनी माहिती दिली आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी अभिनेत्याची शेवटची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याकडे फक्त शेवटचे 40 दिवस शिल्लक आहेत. म्हणून अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून महमूद कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असले तरी, मात्र डाॅक्टरांनी त्यांच्याकडे शेवटचे 40 दिवस शिल्लक असल्याचं म्हटलं आहे. महमूद हे 67 वर्षांचे आहेत. महमूद यांना शेवटचं भेटण्यासाठी अभिनेता जॉनी लिवर गेले होते. यावेळी त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोणत्या सिलेब्रिटींनी भेट घेतली?

बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जाॅनी लिवर यांनी भेट घेतल्यानंतर अभिनेते राजू श्रेष्ठ यांनी देखील महमूद यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये ज्युनियर महमूद यांना पाहिल्यानंतर मास्टर राजू भावुक झाल्याचं समजलं. ज्युनियर महमूद यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत मास्टर राजू याने कॅप्शनमध्ये, ‘यांना पोटाचा कर्करोग आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा…’ असं लिहिलं आहे.

Bollywood News : ज्युनियर महमूद यांचे 20 किलो वजन घटले-

ज्युनियर महमूद गेल्या काही दिवसांपासून बिछान्याला खिळले आहेत. त्यांचं जवळपास 20 किलो वजन कमी झाल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे. ज्युनियर महमूद यांच्या घरीच त्याच्यावर उपचार सुरु असून, त्यांची पत्नी आणि मुलं अभिनेत्याची काळजी घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी कलाक्षेत्रातून प्रार्थना केली जात आहे.

News Title : bollywood news this actor is on deaths door

थोडक्यात बातम्या –

Weather Update | पुढच्या वर्षी देखील पाऊस नाही?, हवामान विभागाचा मोठा इशारा

Nashik | चालू व्याख्यानात विश्वंभर चौधरींना धक्काबुक्की, भाजप पदाधिकाऱ्यांसह ‘या’ लोकांवर आरोप

Pune Crime | पैशांचा पाऊस पाडण्यासाठी सुरु होती पूजा, तेवढ्यात… पुण्यात धक्कादायक प्रकार

Weather Update | मिचौंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात काय होणार?, हवामान विभागाचा मोठा इशारा

Telangana Election 2023 | सर्वात मोठी बातमी: तेलंगणात तत्कालीन मुख्यमंत्र्यासह भावी मुख्यमंत्र्याचाही पराभव