Rain Update: अन् पाहता पाहता पावसाच्या पाण्यात कार वाहू लागल्या… भयानक दृश्यं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rain Update | महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाची बॅटींग चालूच आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं फार नुकसान झालं आहे. गेल्या काही दिवसात भारतीय किनारपट्टीवर ‘मिचौंग’ चक्रिवादळाने एन्ट्री केली आहे. याचा परिणाम काही भागात होत आहे, तर चक्रीवादळामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस सुरु आहे.

चक्रिवादाळामुळे चेन्नईत मुसळधार पाऊस-

मिचौंग चक्रिवादळाने सध्या चेन्नईसह अनेक राज्यात एन्ट्री केली आहे. या भागात अति मुसळधार पाऊस (Rain Update) पडत आहे. शिवाय हवामान विभागाने येथील स्थानिक नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. पावासाने जोर धरल्यामुळे येथील रस्ते पाण्यात गेले आहेत, तर दुसरीकडे रस्त्यांवर असलेल्या गाड्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत.

चक्रिवादळामुळे सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, विमानतळ देखील पाण्यात बुडाले आहे. त्यामुळे अनेक विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पावसामुळे राज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळ 5 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळामुळे किनारपट्टीवर 110 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे.

हवामान विभागाकडून रेड अलर्ट-

35 ते 80 किमी वेगाने ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या परिसरात वारं वाहात आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याचा आदेश देण्यात आला आहे. तर, येथील नागरिकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत 1913 हा क्रमांक राज्य सरकारने दिला आहे. राज्यात मंगळवारी सुद्धा मुसळधार पावसाचा (Rain Update) इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाचे उपमहानिदेशक बालचंद्रन यांनी म्हटले की, “चेन्नई, चेंगलपट्टू आणि कांचीपूरम जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला आहे.”

चक्रिवादाळमुळे शहर वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे बससेवा देखील बंद करावी लागत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे, शिवाय पावसामुळे चेन्नईमधून 70 विमानांनी उड्डाण रद्द केले आहे.

News Title: Rain Update in Chennai

थोडक्यात बातम्या-

Bollywood News | ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता मृत्यूच्या दारात, सिनेसृष्टीत एकच खळबळ

Weather Update | पुढच्या वर्षी देखील पाऊस नाही?, हवामान विभागाचा मोठा इशारा

Nashik | चालू व्याख्यानात विश्वंभर चौधरींना धक्काबुक्की, भाजप पदाधिकाऱ्यांसह ‘या’ लोकांवर आरोप

Pune Crime | पैशांचा पाऊस पाडण्यासाठी सुरु होती पूजा, तेवढ्यात… पुण्यात धक्कादायक प्रकार

Weather Update | मिचौंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात काय होणार?, हवामान विभागाचा मोठा इशारा