Farmer Issue | शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार?, संसदेत पहिल्याच दिवशी घुमला आवाज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मुद्दा (Farmer Issue) पहिल्याच दिवशी सभागृहात मांडण्यात आला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली.

कोणी केली सातबारा कोरा करण्याची मागणी?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) पहिल्याच दिवशी लोकसभेत आक्रमक झालेल्या पहायला मिळाल्या. शेतकऱ्यांचा मुद्दा त्यांनी सभागृहात लावून धरलेला दिसला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी त्यांनी थेट केंद्र सरकारकडे केली.

Supriya sule

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

महाराष्ट्रात एकीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्रातील काही भागात बसलेला दिसत आहे. या अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्षं, कांदा, केळी, गहू, धान, कापूस, सोयाबीन इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्याच्या दुधाला देखील भाव मिळत नसल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे, त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना मदत करण्याची गरज आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी (Farmer Issue) केंद्र सरकारने तातडीने महाराष्ट्रात पथकं पाठवावीत आणि केंद्राने महाराष्ट्राला मदत करावी. याशिवाय शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना नवीन कर्ज देखील देण्यात यावं, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकार टीका-

एका बाजूला शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव देत नसून याबाबतच्या धोरणांत सातत्याने चढउतार होताना पहायला मिळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

खासदार धनंजय महाडिक यांनीही उठवला आवाज-

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर (Farmer Issue) राज्यसभेतही खासदार धनंजय महाडिक यांनी आवाज उठवला. मागील आठवड्यात महाराष्ट्रात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पाठवलेल्या प्रस्तावानुसार केंद्राकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

News Title: Farmer Issue and Supriya sule speech in loksabha

महत्त्वाच्या बातम्या-

Rain Update: अन् पाहता पाहता पावसाच्या पाण्यात कार वाहू लागल्या… भयानक दृश्यं

Bollywood News | ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता मृत्यूच्या दारात, सिनेसृष्टीत एकच खळबळ

Weather Update | पुढच्या वर्षी देखील पाऊस नाही?, हवामान विभागाचा मोठा इशारा

Nashik | चालू व्याख्यानात विश्वंभर चौधरींना धक्काबुक्की, भाजप पदाधिकाऱ्यांसह ‘या’ लोकांवर आरोप

Pune Crime | पैशांचा पाऊस पाडण्यासाठी सुरु होती पूजा, तेवढ्यात… पुण्यात धक्कादायक प्रकार