Weather Update 1 | विजांच्या कडकडाटासह पाऊस, महाराष्ट्रातील ‘या’ भागांना मोठा अलर्ट!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसानं (Weather Update) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी राजा उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आहे. अशात अवकाळी पावसानं अद्याप थांबण्याचं नाव घेतलेलं नाही. आता हवामान विभागानं नवा अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे.

बंगालच्या उपसागरात मिचॉंग नावांचं चक्रीवादळ आलेलं आहे. तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यांना या चक्रीवादळाचा मोठा फटका बसणार आहे, मात्र महाराष्ट्रामध्येही या चक्रीवादळामुळे मोठा परिणाम होत असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील पावसावर याचा परिणाम होतोय.

rain update 1 jpg

नेमका कुठे कुठे इशारा दिलाय?

मिचॉंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील विदर्भासह मराठवाड्याला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. हवामान विभागाने यासंदर्भात एक महत्त्वाची (Weather Update) माहिती दिली आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज देण्यात आला आहे. आज (मंगळवारी) विदर्भासह मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

विदर्भात कसा पाऊस असेल?

मिचॉंग चक्रीवादळामुळे सर्वाधिक प्रभावित होणार महाराष्ट्रातील भाग हा विदर्भाचा असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज जो पाऊस (Weather Update) सांगितला आहे, त्याचं बहुतांश क्षेत्र विदर्भातील आहे. त्यामुळे विदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भातील कोणत्या भागांना इशारा?- विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

rain jpg

मराठवाड्यातील काही भागांनाही पावसाचा अलर्ट-

हवामान विभागाने मराठवाड्यात सुद्धा पावसाची शक्यता वर्तवली आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मराठवाड्यात नेमका कुठे पाऊस?- मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात आलेल्या मिचॉंग चक्रीवादळाने तामिळनाडू राज्यात हाहाकार माजला आहे. आंध्रप्रदेशात देखील या चक्रीवादळाची तीव्रता दिसून येत आहे. महाराष्ट्रात सोमवरपासून ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण पावसासाठी पोषक असल्याने महाराष्ट्रावर अद्यापही पावसाचं सावट आहे.

News Title: weather update today Maharashtra rain alert

महत्त्वाच्या बातम्या-

Sexual Disease | सावधान! शरीरसंबंध ठेवताना काळजी घ्या, वेगानं वाढतोय ‘हा’ आजार!

Cough Syrup | खोकल्यासाठी कफ सीरप पिताय?, आधी ही बातमी नक्की वाचा

Farmer Issue | शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार?, संसदेत पहिल्याच दिवशी घुमला आवाज

Rain Update: अन् पाहता पाहता पावसाच्या पाण्यात कार वाहू लागल्या… भयानक दृश्यं

Bollywood News | ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता मृत्यूच्या दारात, सिनेसृष्टीत एकच खळबळ