Hardik Pandya | टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू (Team India) आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्या सध्या त्याच्या दुखापतीविरोधात झुंज देत आहे आणि नुकत्यात हाती आलेल्या माहितीनूसार सध्याच्या परिस्थितीत त्याच्यासाठी खेळपट्टीवर पुनरागमन करणे सध्या तरी कठीण आहे. (IPL 2024)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, हार्दिक पांड्या सध्या 18 आठवड्यांच्या पुनर्वसन प्रोग्रामवर आहे. 2023 विश्वचषक स्पर्धेत पुण्यामध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. हार्दिक (Hardik Pandya) स्वतःचे पहिले षटक टाकत असताना त्याचा पाय मुरगळला होता आणि त्यामुळे त्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील एनसीएमध्ये गेला होता.
हार्दिक पांड्याला जेव्हा दुखापत झाली तेव्हा तो लवकर बरा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र जेव्हा त्याने पुन्हा सराव सुरू केला तेव्हा अचानक त्याच्या डाव्या घोट्याला पुन्हा सूज येऊ लागली आणि तो आता पहिल्यासारखी गोलंदाजी करण्यास तंदुरुस्त राहिलेला नाही.
हार्दिक पांड्याला झालेली दुखापत ही एक अत्यंत गंभीर अशी दुखापत होती. साधं इंजेक्शन देऊन ती हाताळली जाऊ शकेल अशी ती अजिबात नव्हती. कालांतराने त्याची सूज आणखी वाढली होती, त्यामुळे हार्दिकला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हार्दिक पांड्याला पूर्ण वेळ दिला जातोय!
आता हाती आलेल्या बातमीनूसार, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुनरागमन करण्यासाठी पूर्ण वेळ घेणार आहे. ‘क्रिकेट नेक्स्ट‘च्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, हार्दिक 18 आठवड्यांच्या पुनर्वसन कार्यक्रमातून जात आहे.
हार्दिकला तंदुरुस्त होण्यासाठी पूर्ण वेळ देणे हा त्यामागचा महत्त्वाचा विचार आहे. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी हार्दिकचा संघात समावेश केला जाऊ शकतो, असं बोललं जात आहे. परंतु हार्दिकने स्वतःची तंदुरुस्ती परत मिळावी, यासाठी त्याला पुरेसा वेळ दिला जाईल, असं ठरलं आहे. पांड्याची ही दुखापत आधीच्या दुखापतीपेक्षा खूपच वेगळी होती, असंही आता समोर आलं आहे.
News Title: Hardik Pandya injury latest update
महत्त्वाच्या बातम्या-
Online Game | पोलिसाच्या पत्नीचं नशीब उजळलं, करोडो रुपयांसह आयफोन-बुलेटही मिळाली
Weather Update 1 | विजांच्या कडकडाटासह पाऊस, महाराष्ट्रातील ‘या’ भागांना मोठा अलर्ट!
Sexual Disease | सावधान! शरीरसंबंध ठेवताना काळजी घ्या, वेगानं वाढतोय ‘हा’ आजार!
Cough Syrup | खोकल्यासाठी कफ सीरप पिताय?, आधी ही बातमी नक्की वाचा
Farmer Issue | शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार?, संसदेत पहिल्याच दिवशी घुमला आवाज