Weather Update | महाराष्ट्रातील ‘या’ भागांना पुन्हा पावसाचा इशारा, शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | महाराष्ट्रात अवकाळी पावसाने ऐन हिवाळ्यामध्ये कमबॅक केलं आहे. त्यामुळे अनेक राज्यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झालं आहे, यामुळे नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग चक्रिवादळ’ (Michaung Cyclone) आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर, हवामान विभाग गेले काही दिवस राज्यातील काही भागाना हवामानाचा महत्त्वाचा इशारा देत आहे. सध्या चेन्नईमध्ये सुरु असलेल्या चक्रिवादाळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांना होत आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील काही भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून काय माहिती आली?

सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा फटाका रब्बी पिकांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये पाहिजे तसा पाऊस न पडल्याने राज्याच्या काही भागात दुष्काळ (Weather Update) पडला होता. मात्र, आता पडलेल्या पावासामुळे शेतकऱ्यांच्या पिकांंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी-

शेतकऱ्यांसाठी चिंतेत भर घालणारी बातमी समोर आली आहे. बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग चक्रिवादळचा’ (Michaung Cyclone) परिणाम महाराष्ट्रात दिसून येणार आहे. 5 ते 9 डिसेंबर दरम्यान विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

6 डिसेंबरला त्याची तीव्रता अधिक परिणामकारक राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (Regional Meteorological Centre) वर्तवला आहे. दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असं हवामान विभागाने सांगितलंय. परिणामी शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना देखील जिल्हा कृषी हवामान केंद्राने दिल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी मोलाचा सल्ला-

अवकाळी पावसाचं वातावरण लक्षात घेता शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. त्यासाठी आंतरमशागतीची कामं, कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी फवारणीची कामे, यासोबतच उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील 2 ते 3 दिवस पुढे ढकलावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

पुढील 24 तासात राज्यात पाऊस-

महाराष्ट्रात मिचॉन्ग चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. दरम्यान, पुढील 24 तासांत राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागपुर जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र आणि नागपूरच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार, 5 ते 9 डिसेंबर दरम्यान आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

News Title : weather update heavy rain occur in this state
थोडक्यात बातम्या-

Hardik Pandya | हार्दिक पांड्या आता लवकर संघात दिसणार नाही!, मोठी बातमी आली समोर

Online Game | पोलिसाच्या पत्नीचं नशीब उजळलं, करोडो रुपयांसह आयफोन-बुलेटही मिळाली

Weather Update 1 | विजांच्या कडकडाटासह पाऊस, महाराष्ट्रातील ‘या’ भागांना मोठा अलर्ट!

Sexual Disease | सावधान! शरीरसंबंध ठेवताना काळजी घ्या, वेगानं वाढतोय ‘हा’ आजार!

Cough Syrup | खोकल्यासाठी कफ सीरप पिताय?, आधी ही बातमी नक्की वाचा