Weather Update | राज्यात बुधवारी कसा राहील पाऊस?, सर्वात मोठी बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update |  राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

यासोबतच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झालं आहे, यामुळे नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग चक्रिवादळ’ (Michaung Cyclone) आलं आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागांत होत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यात उद्याच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाकडून वर्तवलेला अंदाज –

अवघ्या राज्यभरात सुरु असलेल्या पावासा थैमानाबाबत हवामान विभागाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्राचं बुधवारचं हवामान अंदाज सांगत असताना राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बरोबरच मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे.

(Weather Update) तापमानाबाबात दिलेली माहिती-

दरम्यान, राज्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. तसेच, राज्यातील किनारपट्टी भागात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता देखील असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. राज्यातील कोणत्या शहरात ढगाळ वातावरण राहिल याच्याबद्दल महत्त्वाची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

या शहरात हलका पाऊस-

अवकाळी पावासामुळे, काही राज्यातील किनारपट्टी भागात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. तर, मुंबई शहरात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच बरोबर, पुणे शहरात देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे हवामान थोडेसे थंड होईल. नाशिक शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी-

राज्यातील शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती लक्षात ठेवून आपल्या पिकांची काळजी घ्यावी. राज्यातील नागरिकांनी हवामान बदलाच्या प्रभावामुळे होणाऱ्या बदलांसाठी तयार राहावे. त्यासाठी आंतरमशागतीची कामं, कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी फवारणीची कामे, यासोबतच उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील 2 ते 3 दिवस पुढे ढकलावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

News Title : weather update about tomorrows rainfall
थोडक्यात बातम्या-

Weather Update | महाराष्ट्रातील ‘या’ भागांना पुन्हा पावसाचा इशारा, शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला

Ishan Kishan | “फक्त 3 सामने खेळून दमला का?”, बड्या खेळाडूचा सवाल

Hardik Pandya | हार्दिक पांड्या आता लवकर संघात दिसणार नाही!, मोठी बातमी आली समोर

Online Game | पोलिसाच्या पत्नीचं नशीब उजळलं, करोडो रुपयांसह आयफोन-बुलेटही मिळाली

Weather Update 1 | विजांच्या कडकडाटासह पाऊस, महाराष्ट्रातील ‘या’ भागांना मोठा अलर्ट!