Anger | खूप राग येणं जीवावर बेतू शकतं; होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | माणसाच्या मनात एकच प्रश्न येत असतो की आनंदी कसं राहायचं. पण आपण प्रत्येक वेळी आनंदी राहू शकतो का? तर नाही. कारण आयुष्यात अनेक प्रसंग येतात आपण त्यानुसार व्यक्त होतो. पण काही प्रसंग आपला संयम तपासणारे असतात. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाचा राग. चिडचिड, निराशा कधी नैराश्याचं तर कधी रागाचं (Anger) कारण बनतं. मग ते करिअर असो, अभ्यास असो, बँक बॅलन्स असो, मित्र असो, मैत्रीण असो किंवा इतर काहीही त्या रागाचं कारण असू शकतं. माणसाला कोणत्याही परिस्थितीत शांत राहता आलं आणि त्याच्या रागावर नियंत्रण मिळवता आलं तर बऱ्याच गोष्टी सोप्या होऊ शकतात. पण हाच राग नियंत्रणाबाहेर गेला तर तो आपल्या जीवावर देखील बेतू शकतो.

खूप राग (Anger)येणं जीवावर बेतू शकतं

अनेकदा रागात (Anger) आपल्याला भान राहत नाही. आपण काय करतोय, काय बोलतोय. अनेकांचा राग वेगवेगळ्या रूपाने बाहेर पडतो. काहीजण बोलून तर काहीजण आदळाआपट करून आपला राग (Anger) काढत असतात. काहींचा तर हात देखील उचलला जातो. पण आपण हे विसरतो की राग हा क्षणिक असतो. पण त्या रागात आपण जे वागतो त्याचा परिणाम स्वत:वर तर होतोच होतोच इतरांवर देखील त्याचा परिणाम होत असतो.

खूप राग येणं जीवावर बेतू शकतं. कारण राग आल्याने स्ट्रेस हार्मोन्स जास्त तयार होतात. रक्तदाब वाढतो आणि नंतर उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका-स्ट्रोकचा धोका वाढतो.

वाढलेल्या रागावर कसं नियंत्रण मिळवावं?

थोडा वेळ फिरायला जा, ध्यान करा, एक दीर्घ श्वास घ्या, गाणे ऐका
चांगली झोप घ्या, आवडत्या व्यक्तीशी बोला

Anger  राग धोकादायक आहे

रागाचे स्वरूप समजून घ्या
रागाने तुमचा स्वभाव गमावू नका
आत्मनियंत्रण शिका
रागाची लक्षणे ओळखा

Anger can cause heart attack

महत्त्वाच्या बातम्या- 

सरकारने Post office FD च्या नियमात केला ‘हा’ मोठा बदल!

Weather Update | राज्यात बुधवारी कसा राहील पाऊस?, सर्वात मोठी बातमी समोर!

Pune News | पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

Weather Update | महाराष्ट्रातील ‘या’ भागांना पुन्हा पावसाचा इशारा, शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला

Ishan Kishan | “फक्त 3 सामने खेळून दमला का?”, बड्या खेळाडूचा सवाल