MS Dhoni | “समोरच्या टीमनं 400 बनवले तरी…”, शर्माजीच्या मुलाचं धोनीबद्दल मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | 2007 च्या T20 विश्वचषक विजयाचा हिरो जोगिंदर शर्माने माजी कर्णधार एमएस धोनीचं (MS Dhoni) तोंडभरून कौतुक केलं आहे. तो म्हणाला की एमएस धोनीचा स्वतःवर इतका विश्वास आहे की तो कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकू शकतो.

जोगिंदर शर्माने 2007 च्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शानदार गोलंदाजी करून भारताला विश्वचषक विजेतेपद मिळवून दिलं होतं. त्यानंतर तो रातोरात सुपरस्टार बनला.

जोगिंदर शर्मा अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात केलेल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यावेळी महेंद्रसिंगने शेवटच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी जोगिंदर शर्माकडे चेंडू सोपवला होता आणि त्याने त्याची कमाल दाखवलेली. धोनीने दिलेल्या संधीचं सोनं त्याने करून दाखवलेलं. नुकतंच प्रसिद्ध पत्रकार शुभंकर मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत जोगिंदर शर्मा एमएस धोनीबद्दल भरभरून बोलला.

“MS Dhoni चा स्वतःवर प्रचंड आत्मविश्वास होता”

महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) स्वत:वर इतका विश्वास होता की विरुद्ध संघाने 400 धावा केल्या तरी तो त्याचा पाठलाग कसा करू शकतो. एमएस धोनी एक चांगला कॅप्टन होता कारण त्याला माहित होतं की एखाद्या खेळाडूमध्ये किती क्षमता आहे. आणि त्या खेळाडूचा वापर कसा करायचा. त्याची शक्ती काय आहे हे त्याला माहित होतं, असं जोगिंदर शर्मांनी सांगितलंय.

जोदगिंदर शर्मांची कारकिर्द

जोगिंदर शर्माने 2004 मध्ये बांगलादेश विरुद्ध भारताकडून वनडे करिअरची सुरुवात केली होती. जोगिंदरने शानदार खेळी खेळली आणि त्याच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 29* धावा केल्या. त्याने आपल्या कारकिर्दीत केवळ 4 वनडे आणि 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये 16 सामनेही खेळले आहेत.

Joginder Sharma’s big statement about Dhoni

महत्त्वाच्या बातम्या- 

Health Tips | थंडीत आजारी पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी?

“मी तोपर्यंत खेळणार, जोपर्यंत…”, IPL मध्ये खेळण्यावरुन ग्लेन मॅक्सवेलचं मोठं वक्तव्य

Bollywood News | मद्यधुंद अवस्थेतील सनी देओलचा व्हिडीओ व्हायरल, नेमका खरा प्रकार आहे तरी काय?

Bjp | आत्ताची मोठी बातमीः भाजपच्या 12 खासदारांनी दिला राजीनामा

लहान मुलांची काळजी घ्या; मुंबईतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर