Chhagan Bhujbal | ‘आता मराठा शिल्लक राहणार नाही’; भुजबळांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाही, असं छगन भुजबळांनी म्हटलंय. नागपूरात अधिवेशनासाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

भुजबळांचं मोठं वक्तव्य

हरिभाऊ राठोड ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचे सर्व लोक राजीनामा देत आहेत, तो आयोग आता ओबीसीचा राहिलेला नाही. तो मराठा आयोग झालेला आहे. जरांगेचा रोजचं काम आहे बोलणं, त्याच्याशिवाय त्याचं भाषण कोणी ऐकणार नाही, असं भुजबळांनी (Chhagan Bhujbal) म्हटलंय.

विधिमंडळात ओबीसींच्या मुद्द्यांवर चर्चेची आवश्यकताच नाही, कारण सर्व मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसीमध्ये येत आहेत. त्यामुळे मराठा आता महाराष्ट्रात शिल्लक राहणार नाही, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणालेत. सर्व कुणबीच होणार आहेत. तर मागासवर्ग आयोग राहिलेला नाही आता मराठा आयोग झाला, असंही भुजबळ म्हणालेत.

“महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाही”

सर्व सर्टिफिकेट घेत आहेत, त्यासाठी प्रयत्न सुरू आहे, न्यायमूर्ती शिंदे गावोगावी फिरवून सर्टिफिकेट द्या सांगत आहे. आता काही शिल्लक राहिलेले नाही, आता महाराष्ट्रात मराठा शिल्लक नाही, सर्व कुणबी झाले आहेत”, असं भुजबळ म्हणाले आहेत.

दरम्यान, “आता ज्याप्रमाणे दादागिरीने कुणबी सर्टिफिकेट घेतात, खोटी सर्टिफिकेट घेतात. तसेच पुढे सुद्धा होणार आहे. जात पडताळणीच्या वेळेलाही असेच होणार आहे.

कोणी फोन करणार, कोणी दादागिरी करणार आणि जात पडताळणी करून घेणार, जर सर्व मराठा ओबीसीमध्ये येणार असतील तर, काय करायचं ओबीसीवर चर्चा घेऊन”, असं भुजबळ म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Qualities In Men | महिलांना आकर्षित करण्यासाठी पुरुषांकडे हवेत ‘हे’ गुण

Weather Update | राज्यात ‘या’ तारखेपासून थंडीचा जोर, हवामान विभागाचा इशारा

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवारांना मोठा धक्का!

FD करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर!

Aditya Thackeray | दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना झटका, आता…