Weather Update | राज्यात ‘या’ तारखेपासून थंडीचा जोर, हवामान विभागाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. ऐन हिवाळ्यात अनेक भागात पावसाने कमबॅक केलं होतं. त्यामुळे यंदा पाहिजे तशी थंडी जाणवत नाही. तर काही ठिकाणी आणखी सुद्धा बारीक सरींचा पाऊस चालू आहे. दरम्यान, हवामान विभागाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

हवामान विभागाने कोणती माहिती दिली?

राज्यभरात सुरु असलेल्या पावासामुळे यंदा राज्यात थंडी सुरु झाली नाही. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या सगळीकडे ढगाळ वातावरण दिसत आहे. मात्र, तसेच विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया अशा 6 जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यामुळे येत्या शुक्रवारपासून म्हणजे 8 डिसेंबरपासून वातावरण (Weather Update) पूर्णपणे निवळून थंडीला सुरवात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या भू-भागाकडे वळणारे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकून समुद्रातच विरण्याची शक्यता आहे.

माणिकराव खुळे यांनी काय सांगितलं?

महाराष्ट्रात काही दिवसात अपेक्षित किरकोळ पावसाची शक्यताही आता मावळली असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

दरम्यान माध्यमांकडून मिळालेल्या माहितनूसार, उत्तर भारतात सध्या एकापाठोपाठ एक प्रवेश करणारे पश्चिमी झंजावात, त्यातून पडणारा पाऊस आणि बर्फबारीमुळं तेथील सकाळची दृश्यता खालावली असून तिथे थंड वातावरण आणि धुके जाणवत आहे.

News Title : weather update cold to start from this date

थोडक्यात बातम्या-

Aditya Thackeray | दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना झटका, आता…

Pune Crime | ‘माझी नाही तर कोणाचीच नाही…’; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

Dhananjay Munde | “बापाची चप्पल पोराच्या पायात आली म्हणजे तो…”

Uddhav Thackeray | ठाकरेंचा मोठा प्लॅन; शिंदे सरकार अडचणीत येणार?

MS Dhoni | “समोरच्या टीमनं 400 बनवले तरी…”, शर्माजीच्या मुलाचं धोनीबद्दल मोठं वक्तव्य