IPL | न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू तुमच्या संघात हवाच!, इरफान पठाणने कुणाला दिला मोलाचा सल्ला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | IPL 2024 साठी 19 तारखेला लिलाव होणार आहे. त्याआधी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने 2016 मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला (SRH) मोलाचा सल्ला दिला आहे. संघात न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रचा (Rachin Ravindra) समावेश असावा, असं इरफान पठाणने म्हटलंय.

इरफानचा सनरायझर्स हैदराबादला सल्ला

IPL 2024 च्या आगामी लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या 6 खेळाडूंना रिलीज केलं आहे. लिलावासाठी आता SRH कडे 34 कोटी रुपये आहेत. त्यांना त्यांच्या 6 पैकी 3 जागा परदेशी खेळाडूंनी भरायच्या आहेत.

सनरायझर्स हैदराबादला विकेट घेणारा फिरकीपटू आवश्यक आहे आणि (IPL) बॅकअप सलामीवीरासाठी एक चांगला पर्याय म्हणून रचिन रवींद्रचं (Rachin Ravindra) नाव इरफानने संघाला सुचवलं आहे.

सनरायझर्स हैदराबादला योग्य स्पीनर हवा आहे जो विकेट घेणारा आहे. त्यांच्याकडे आदिल रशीद होता, पण त्याची सुटका झाली. त्यांच्याकडे मयंक मार्कंडे आहे पण त्यांना त्याहून अधिक काहीतरी हवं आहे, असं इरफान म्हणाला.

“म्हणून Rachin Ravindra ला संघात घेणं गरजेचं”

जोपर्यंत फलंदाजीचा प्रश्न आहे, त्यांच्याकडे वॉशिंग्टन सुंदर आणि मार्को यान्सेन हे दोन अष्टपैलू खेळाडू आहेत, जे प्लेइंग इलेव्हनमध्ये एकत्र खेळू शकतात. बॅकअप ओपनिंग बॅट्समन त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच त्यांना रचिन रवींद्रला संघात घेणं गरजेचं असल्याचं इरफानने सांगितलं आहे.

दरम्यान, रचिन रवींद्रने नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात न्यूझीलंडकडून काही सामने क्रमांक 3 आणि काही सामने सलामीवीर म्हणून खेळले आहेत. रविंद्रने त्यांची धमाकेदार कामगिरी दाखवली.

महत्त्वाच्या बातम्या-

Manoj Jarange | “मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो”

Chhagan Bhujbal | ‘आता मराठा शिल्लक राहणार नाही’; भुजबळांचं मोठं वक्तव्य

Qualities In Men | महिलांना आकर्षित करण्यासाठी पुरुषांकडे हवेत ‘हे’ गुण

Weather Update | राज्यात ‘या’ तारखेपासून थंडीचा जोर, हवामान विभागाचा इशारा

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवारांना मोठा धक्का!