मुंबई | प्रसिद्ध टेलिव्हिजन कपल तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा (Karan-Tejasswi) यांची जोडी खूप चर्चेत आहे. हे जोडपे कुठेही गेले तरी सर्वांचं लक्ष वेधून घेतं. करण कुंद्रा सध्या त्याच्या नवीन प्रोजेक्ट टेम्पटेशन आयलंड इंडियामध्ये खूप व्यस्त आहे. या शोमध्ये तो मौनी रॉयसोबत दिसत आहे.
Karan-Tejasswi टेम्पटेशन आयलंडमध्ये दिसणार?
जिथे जोडपे त्यांच्या प्रेमाची परीक्षा घेतात. इथे जोडप्यांना एका बेटाच्या आत दोन वेगवेगळ्या घरात ठेवलं जातं आणि त्यांच्यासोबत इतर काही जोडप्यांना देखील ठेवलं जातं जिथे त्यांना त्यांच्या प्रेमाची परिक्षा घ्यावी लागते. हा शो आणखी रंजक होणार असल्याचं दिसतंय. कारण यात तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा (Karan-Tejasswi) यांची जोडी पाहायला मिळणार असल्याची माहिती आहे.
शोला रंजक बनवण्यासाठी तो स्वतः तेजस्वीसोबतच्या प्रेमाची चाचणी घेताना दिसणार आहे. आत्तापर्यंत या घरात बहुतेक जोडप्यांचं ब्रेकअप झालं आहे, ज्यांनी ब्रेकअपनंतर शो सोडण्याचं आवाहनही केलं आहे.
करणलाही तेजस्वीसोबत (Karan-Tejasswi) ब्रेकअप करायचं आहे का?, असा अंदाज लावला जात आहे. कारण करणने एक वक्तव्य केलेलं. करणने शो चा टीआरपी वाढवण्यासाठी तेजस्वीसोबत ब्रेकअप करणार असल्याचं सांगितलं होतं.
करणने त्यांच्या वक्तव्याला प्रमोशन स्टंट म्हटलं आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले की आपण हे केवळ प्रमोशनसाठी केलं आहे आणि आपल्याला असं काहीही करायचं नाही. करण आणि तेजस्वी हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील खूप प्रसिद्ध जोडपे आहेत आणि चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL | न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू तुमच्या संघात हवाच!, इरफान पठाणने कुणाला दिला मोलाचा सल्ला
Manoj Jarange | “मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो”
Chhagan Bhujbal | ‘आता मराठा शिल्लक राहणार नाही’; भुजबळांचं मोठं वक्तव्य
Qualities In Men | महिलांना आकर्षित करण्यासाठी पुरुषांकडे हवेत ‘हे’ गुण
Weather Update | राज्यात ‘या’ तारखेपासून थंडीचा जोर, हवामान विभागाचा इशारा