‘जावई 25 व्या वर्षात 2 फ्लॅटवाला पाहिजे’; पुण्यातील तरूणाने पालकांना दाखवला आरसा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | देशात मुलींचे प्रमाण मुलांहून कमी असल्याने मुलांना विवाहासाठी मुलीकडचे मंडळी म्हणतील तशी तडजोड करावी लागते. मुलींच्या आणि तिच्या आई वडिलांच्या इच्छा आकांक्षा ऐकून लग्नाआधीच घोड्यावर बसलेल्या नवरदेवाचं काही खरं नाही अशी परिस्थिती पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून शहरी भाग असो वा ग्रामीण भाग असो मुलांचं लग्न होणं फार अवघड होऊ बसलं आहे. याचा परिणाम हा मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना भोगावा लागत आहे.

मुलींपेक्षा त्यांच्या आई वडिलांच्या अपेक्षेत वाढ अधिक झाली असल्याचं बोललं जात आहे. कारण मुलगा ज्याठिकाणी नोकरी करत आहे तिथं त्याचा स्वत:चा एकतरी फ्लॅट असावा अशी अपेक्षा मुलीची आणि तिच्या आई वडिलांची असते. तसेच मुलगा सरकारी नोकरदार असावा या अपेक्षेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सरकारी नोकऱ्यांचा तुटवडा आहे. अशातच अनेकजण खेडेगाव सोडून पुण्यात (Pune News) जाऊन एमपीएससी, इतर सरकारी नोकरीसाठी अभ्यास करताना दिसत आहेत. या परिक्षेत उत्तीर्ण होईपर्यंत मुलाचं वय हे निम्म होऊन जातं. गलेलठ्ठ पगाराची अपेक्षा केली जाते. अशा मानसिकतेत एखाद्या तरूणाने काय करावं? असा सवाल त्याच्यासमोर उभा राहतो.

याच वास्तवदर्शी पार्श्वभूमीवर सराकरी नोकरदार, फ्लॅटवाला नवरा हवा आहे. अशा आशयाचे अनेक रिल्स सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहेत. पुण्यात फ्लॅटवाला जावई पाहिजे, अशा आशयाचे देखील रिल्स आहे. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला. पुण्यात स्पर्धा परिक्षेला अभ्यासासाठी येणाऱ्या मुलांमध्ये लग्नाला धरून वेगळ्याच विचारांची स्पर्धा पाहायला मिळते. एपीएमसीच्या 400 ते 500 जागांसाठी तीन ते चार लाख परिक्षार्थी आपलं स्वप्न साकार करण्यासठी येत असतात. (Pune News)

जमीन विकून फ्लॅट अन् लग्नाचं स्वप्न पूर्ण

सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुण्यात (Pune News) फ्लॅट हवा आहे. पगार तब्बल 50 ते 1 लाख असावा. नुकतेच कॉर्पोरेट खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरूणांना 50 ते 1 लाख पगार कसा मिळवावा? हा प्रश्न असतो. खेडेगावातून शहरात पोटापाण्यासाठी आलेली मुलं गावाकडील जमीन विकून फ्लॅट विकत घेताना दिसत आहेत. घराच्या स्वप्नावरच लग्नाचं स्वप्न पूर्ण होत असल्याची परिस्थिती पाहायला मिळते. याच अनुशंगाने एका मुलाने एक पोस्टर हातात पकडत मनातील सल व्यक्त केली आहे. (Pune News)

 पोस्ट व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by comedy wala basu (@comedy_wala_basu)

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. सध्याच्या मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षेला धरून पुण्यात एका तरूणाने फ्लेक्स हातात धरला आहे. लग्नासाठी अधिक अपेक्षा ठेवणाऱ्या मुलीच्या वडिलांना टोला लगावलेला पाहायला मिळत असून त्यामध्ये ”स्वत:ला पुण्यात फ्लॅट घ्यायला 60 वर्ष लागली, आणि जावई मात्र 25 व्या वर्षात 2 फ्लॅटवाला पाहिजे…वाह रे दुनिया ‘, असं लिहिण्यात आलंय.

News Title – Pune News Youth Focus On Marriage Issue via Instagram Reel

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

चिन्मय मांडलेकरच्या लेकासाठी सुप्रिया पिळगावकरांची पोस्ट, म्हणाल्या…

एसी किंवा कूलरशिवायही घर होईल थंड; फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स

‘…म्हणून मी खूप शहाणा झालो असं नाही’; शरद पवारांनी सुजय विखेंना झापलं

‘मी शब्दाचा पक्का’; हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारेंबाबत अजित पवार स्पष्टच बोलले