एसी किंवा कूलरशिवायही घर होईल थंड; फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Tips To Keep Room Cool | उन्हाळ्यात घरात दिवस-रात्र पंखा, कूलर तसंच एसी सुरू असते. उन्हातून घरी आल्यावर आपण पहिले कूलरसमोर जाऊन बसतो. आता दिवसभर कूलर, पंखा चालू ठेवला तर लाईटबीलही भरभर वाढेल.शिवाय, पाण्याचा देखील भरपूर वापर होईल.

मग, अशात एसी किंवा कूलरशिवाय घर कसं थंड ठेवता येईल?, तर याचं उत्तर या लेखात दिलं आहे. आता तुम्ही एसी, कूलर न वापरता देखील आपलं घर ‘ठंडा ठंडा कुल कुल’ठेऊ शकता. यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. यामुळे तुमची विजेची देखील बचत होण्यास मदत होईल.

घर थंड ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

पडदे : घराचे पडदे कसे आहेत, त्यावरूनही रूममध्ये उष्णता निर्माण होते. त्यामुळे घराच्या खिडक्यांना जाड पडदे किंवा पट्ट्या लावा जेणेकरून सूर्याची किरणे थेट घरात येणार नाहीत, त्यामुळे घर थंड राहील.

क्रॉस व्हेंटिलेशन : क्रॉस वेंटिलेशन ही रूमच्या आतील भागात उष्णता आणि वास काढून टाकण्यासाठी बाहेरील हवेचा वापर करते. ही रूम थंड करण्याची एक नैसर्गिक पद्धत आहे. ही एक अतिशय सोपी आणि नैसर्गिक पद्धत आहे.

लहान रोपं लावावीत : उष्णता किंवा गरमी (Tips To Keep Room Cool ) टाळण्यासाठी घरात रोपं लावली पाहिजेत. यामुळे नैसर्गिकरित्या घर थंड राहते. नर्सरीमध्ये अशी अनेक रोपे मिळतात, जी तुम्ही सहजपणे घरात ठेऊ शकता. ही रोपे खूप वाढत नाहीत, यामुळे घरात एक वेगळीच शोभा देखील येते.

CFL आणि LED बल्ब : जर तुम्ही घरात Incandescent बल्ब लावले असतील तर ते काढून त्याऐवजी CFL आणि LED बल्ब लावा.यामुळे उष्णता तयार होणार नाही आणि घर थंड राहण्यास मदत होईल.

यासोबतच तुम्ही घरात तुमच्या टेबल फॅनसमोर एका बाऊलमध्ये बर्फाचे तुकडे ठेऊ शकता.यामुळे तुम्हाला गार हवा मिळेल आणि घरही थंड राहील. हा उपाय छोट्या खोल्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. असे छोटे-छोटे उपाय करून तुम्ही आपलं घर थंड ठेऊ शकता. उन्हाळ्यात तर या टिप्स खूपच फायद्याच्या ठरतील.

News Title : Tips To Keep Room Cool

महत्त्वाच्या बातम्या-

‘घरच्या मंगळसूत्राला मान देऊ शकले नाही, ते इतरांच्या..’; राऊतांचा नरेंद्र मोदींवर घणाघात

घराबाहेर पडताना काळजी घ्या; ‘या’ 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

राहुल गांधींच्या तोंडी पुन्हा ऐश्वर्या राय बच्चनचं नाव, म्हणाले…

नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट; भुजबळांच्या माघारीनंतर भाजपकडून थेट ‘हा’ नेता मैदानात?

बँकेची कामे लवकरात लवकर उरकून घ्या; मे महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद