‘…म्हणून मी खूप शहाणा झालो असं नाही’; शरद पवारांनी सुजय विखेंना झापलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांना इंग्रजीतून भाषण करून दाखवा, असे आव्हान दिले होते.यावरच आज (25 एप्रिल) शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत सुजय विखेंचा समाचार घेतला.

‘मी इंग्रजीतून जे भाषण केले, ते निलेश लंके यांनी पाठांतर करून नंतर सभेत करून दाखवावे, तसे झाले तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही.’,असं सुजय विखे पाटील म्हणाले होते. यालाच पवारांनी आपल्या भाषेत प्रत्युत्तर दिलंय. निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत शरद पवार बोलत होते.

काय म्हणाले शरद पवार?

मी इंग्रजी बोलतो म्हणजे मी खूप शहाणा झालो असं नाही, तुमचं इंग्रजी तुम्हाला लाखलाभ असो, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. राहुरी कारखान्यावर राज्यभरातील मंत्रिमंडळातील अनेक लोक येऊन गेले. कारण सहकारातील उत्तम कारखाना कसा आहे तो पाहण्यासाठी मोठे नेते यायचे पण याच कारखान्याची विखेंनी काय वाट लावली हे मी सांगू इच्छित नाही,असंही पवार म्हणाले.

यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. ज्यांच्या हातात दहा वर्षे सत्ता होती. त्यांनी देशासाठी काय केलं त्याचा हिशोब मागण्याची ही निवडणूक आहे. मोदी म्हणाले होते की, मला सत्ता द्या मी 50 टक्के महागाई कमी करेन. पण आज देशातील महागाईची काय स्थिती आहे. देशात बेकारीचा प्रश्न मोठा आहे. मोदींची गॅरंटी काही कामाची नाही, अशी टीका पवारांनी (Sharad Pawar) केली.

मोदींची गॅरंटी काही कामाची नाही

‘मोदींनी देशासाठी काही केलं नाही. केलं तर केवळ यंत्रणेचा गैरवापर करण्याचे काम झाले. माझ्यावर पण यंत्रणेच्या माध्यमातून केस केली. केजरीवाल यांच्या सारख्या चांगल्या माणसाला तुरुंगात टाकलं. भाजपा सत्तेचा वापर लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त करण्यासाठी करत आहे’, असा हल्लाबोल शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे.

दरम्यान, विखे पाटील यांच्या आव्हानाला निलेश लंके यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान हवा. संसदेत खासदाराला आपल्या भाषेतून बोलता येते. तुम्ही कोणत्या भाषेत बोलता यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची किती बाजू लावून धरता हे महत्वाचे आहे.’,असं निलेश लंके म्हणाले आहेत.

News Title : Sharad Pawar on Sujay Vikhe Patil

महत्त्वाच्या बातम्या-

‘घरच्या मंगळसूत्राला मान देऊ शकले नाही, ते इतरांच्या..’; राऊतांचा नरेंद्र मोदींवर घणाघात

घराबाहेर पडताना काळजी घ्या; ‘या’ 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

राहुल गांधींच्या तोंडी पुन्हा ऐश्वर्या राय बच्चनचं नाव, म्हणाले…

नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट; भुजबळांच्या माघारीनंतर भाजपकडून थेट ‘हा’ नेता मैदानात?

बँकेची कामे लवकरात लवकर उरकून घ्या; मे महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद