‘मी शब्दाचा पक्का’; हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारेंबाबत अजित पवार स्पष्टच बोलले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit pawar | बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. शरद पवार यांचा बालेकिल्ला मिळवण्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. भाजपने केवळ पक्ष फोडला नाहीतर कुटुंब देखील फोडल्याचं दिसतंय. दरम्यान, आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी सुप्रिया सुळेंचा पराभव करण्यासाठी आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतारसंघातून उमेदवारी दिलीय. या राजकारणात केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा हात असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, अजित पवार (Ajit pawar) हे बारामती मतदारसंघातील काही आमदार आणि भाजप नेत्यांना हाताशी घेत सुनेत्रा पवार यांच्या मतांची गोळाबेरीज करताना दिसत आहेत.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि इंदापूरचे अजित पवार (Ajit pawar) गटाचे आमदार दत्तात्रेय भरणे, दौंडचे आमदार राहुल कुल आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना सोबत घेतलं. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात नुकतीच हर्षवर्धन पाटील यांची सभा झाली होती. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सुनेत्रा पवार यांना निवडून देण्यासाठी आवाहन केलं. मात्र हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे यांनासोबत घेऊन किती फरक पडेल असा सवाल माध्यमांनी विचारला असता अजित पवार (Ajit pawar) यांनी उत्तर दिलं.

“मी विश्वासावर राजकारण करतो”

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुनेत्रा पवार यांना निवडून देण्यासाठी आता हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे किती प्रमाणात ताकद लावतील. किती प्रमाणात मनापासून काम करतील हे पाहणं गरेजचं आहे. यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, “सहकार्यांचा 100 टक्के विश्वास असतोच असं नाही. पण मी विश्वास ठेऊन राजकारण करतो. विश्वासावर संपूर्ण जग चालतं. विश्वास ठेवावा लागतो. मी शब्दाचा पक्का आहे. आम्ही एकमेकांविरोधात लढलो तर ताकदीने लढलो. आता एकत्र काम करायचं ठरलं तर मनापासून करतो आहे”, असं अजित पवार म्हणालेत.

“ही निवडणूक मोदी विरूद्ध राहुल गांधी”

“बारामती लोकसभा मतदारसंघातून थेट फाईट होत आहे. काही ठिकाणी तिरंगी लढतही होते. ही भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाही. गेली 35 वर्षे झालं निवडणूक लढवत आहे. मी लोकसभा आणि सात वेळा विधानसभा निवडणूक लढवली. मला प्रचंड मताधिक्याने विजयी केलं. ही निवडणूक मोदी विरूद्ध राहुल गांधी यांची आहे,” असं अजित पवार म्हणाले.  

पुढे बोलत असताना त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य केलं. “नरेंद्र मोदींनी देशाला सांभाळलं. मोदींनी देशाची प्रगती केली. सर्व घटकांना न्याय देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं असं देशातील जनतेचं म्हणणं आहे. त्यांना निवडून द्यायचं असेल तर त्यांच्या विचारांचे खासदार निवडून देणं महत्त्वाचं आहे, ” असं अजित पवार म्हणाले.

News Title – Ajit pawar Talk About Vijay Shivtare And Harshawardhan Patil Support In Baramati loksabha

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

रणबीर कपूर सोबतच्या नात्याबाबत कतरिनाने केला खुलासा, म्हणाली…

“…तर मी राजकारणातून संन्यास घेईल”, महादेव जानकरांची मोठी घोषणा

‘…तर पुढे काही घडू शकतं’; पवारांसोबत जाण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

इतक्या वर्षांनंतर आमिर खानचा मोठा खुलासा, म्हणाला ‘वेळ खूप…’