Katrina Kaif | बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आपल्या हाॅट अदांमुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील कतरिना खूप सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी कतरिना नवनवीन फोटोज आणि व्हिडीओ शेअर करत असते. कतरिना आणि विकी कौशल यांच्या लग्नापूर्वी अभिनेता रणबीर सोबत कतरिना रिलेशनमध्ये होती. चाहत्यांनी या दोघांच्या जोडीला पसंती दिली असली तरी मात्र रणबीर कपूरच्या कुटुंबीयांना त्यांचं नातं मान्य नव्हतं. त्यामुळे या दोघांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला. एक मुलाखतीमध्ये बोलत असताना कतरिनाने याबदल काही खुलासे केले आहेत.
काय म्हणाली कतरिना?
2009 ते 2016 पर्यंत कतरिना (Katrina Kaif) आणि रणबीर एकमेकांना डेट करत होते. मात्र, त्यानंतर कपूर कुटुंबीयांना या दोघांच नातं मान्य नव्हतं त्यामुळे रणबीर आणि कतरिना यांनी नात्याला पूर्णविराम द्यायचा निर्णय घेतला. त्यानंतर रणबीरचं नाव बाॅलिवूड अभिनेत्री दिपीका पदूकोण हिच्यासोबत जोडण्यात आलं. एवढंच नाही तर दिपीका आणि रणबीर एकमेकांना डेट देखील करत होते. या वेळी कतरिनाला दिपीकासोबत तिचं नातं कसं आहे? असा प्रश्न विचारण्यात आला.
तुमचे विचार मर्यादित होतात-
विचारलेल्या प्रश्नावर कतरिना म्हणाली की, ही तर भावनेची गोष्ट झाली. बाकी सगळ्या गोष्टींचं इतकं महत्त्व नाही. आपल्या मनात राग किंवा नाराजी ठेवल्याने काहीच ठीक होत नाही. इथे तुमचे विचार मर्यादित होतात.
पुढे ती म्हणाली की, मी सुद्धा एक माणूसच आहे, मलासुद्धा वाईट वाटतं, मी सुद्धा रडते. मात्र तरी मी पुन्हा उभी राहते आणि म्हणते की सगळं ठीक आहे.
“आमच्यात आता चांगलं नातं आहे”
View this post on Instagram