‘…तर पुढे काही घडू शकतं’; पवारांसोबत जाण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात का? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. यावर खुद्द अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलंय. अजित पवारांनी ‘टीव्ही 9 मराठी’ ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तळात खळबळ माजली आहे.

…तर पुढे काही घडू शकतं- अजित पवार

आम्ही आज जी भूमिका घेतली ती कुणाला योग्य वाटली तर पुढे काही घडू शकतं. इतरांना योग्य वाटली. त्यांच्या सहकाऱ्यांना योग्य वाटली तर पुढे काही गोष्टी घडू शकतं, असं अजित पवारांनी म्हटलंय. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सुनेत्रा पवारांचं नाव भाजपने सुचवलं का? या प्रश्नावर देखील अजित पवारांनी उत्तर दिलंय. अजित पवार म्हणाले की “हा धादांत खोटा प्रचार आहे. कुणी कुणाचं नाव सुचवलं नाही. जागा वाटप झाल्यावर कुणाला उमेदवारी द्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त परभणीची जागा आम्हाला मिळाली होती.

सोशल इंजिनियरिंगसाठी आम्ही ती जागा जानकर यांना दिली. तो निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला. तिथे आधी आम्ही राजेश विटेकरांना तयारीला लागायला सांगितलं होतं. नंतर आम्हाला दोन पावलं मागं घ्यावी लागली. जानकरांसाठी आम्ही आमच्या उमेदवाराला थांबवलं.”

“अजित पवार कुणाच्या ट्रॅपमध्ये फसणारा माणूस नाही”

आम्ही कुणाच्या ट्रॅपमध्ये फसलो नाही. अजित पवार कुणाच्या ट्रॅपमध्ये फसणारा माणूस नाही. माझं रोखठोक काम असतं. असलं लेचंपेचं काम माझ्याकडे नाही. राजकीय जीवनात वाटलं तेव्हा राजीनामा टाकला आणि निघून गेलो. जे काही चित्र रंगवलं जातं, सांगितलं जातं ते धांदात खोटं आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

आमची विकासाची कामं करण्यासाठी राज्यातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राचा निधी आणण्यासाठी भाजपसोबत गेलो, असंही अजित पवारांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

इतक्या वर्षांनंतर आमिर खानचा मोठा खुलासा, म्हणाला ‘वेळ खूप…’

शरद पवारांचा राज ठाकरे पॅटर्न, भरसभेत लावला मोदींचा ‘तो’ व्हिडीओ

“कोण पृथ्वीराज चव्हाण?, मी माझ्या स्टेटसच्या व्यक्तीसोबत बसतो”

सर्वात मोठी बातमी! नितीन गडकरींना भाषणादरम्यान भोवळ

भाड्याचे कपडे घेऊन बॉलीवुड स्टार करतात स्टायलिंग; प्रसिद्ध अभिनेत्याने केली पोलखोल