घराबाहेर पडताना काळजी घ्या; ‘या’ 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Heat Wave | राज्यात उन्हाचा पारा वाढला आहे. अंगाची लाहीलाई होताना दिसतेय. अनेकांना उष्मघाताने  त्रास होतोय. याचा परिणाम वेगवेगळ्या पातळीवर होताना दिसत आहे. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. यवतमाळमध्ये सभेला संबोधित करत असताना भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. तसेच बीड दौऱ्यावर असणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देखील काल उन्हाचा त्रास झाला आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच काही दिवसांआधी कैलास पाटील यांना देखील चक्कर आली. अशातच आता राज्यातील इतर तीन जिल्ह्यांमध्ये देखील उष्णतेची लाट (Heat Wave) येणार आहे. (Heat Wave)

तीन जिल्ह्यात तापमानाची जैसे थे परिस्थिती

मुंबई, रायगड आणि ठाणे येथे गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा 40 अंशापार होता. आता पुन्हा एकदा हीच परिस्थिती मुंबई, रायगड आणि ठाणे येथे पाहायला मिळणार आहे. 27 ते 29 एप्रिल रोजी या तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. राज्यामध्ये वाढत्या तापमानाने उष्मघातासारखी अवघड परिस्थिती पाहायला मिळाली आहे. यामुळे हवामान अभ्यासक नागरिकांना बाहेर पडताना काळजी घेण्याबाबत आवाहन करत आहेत. (Heat Wave)

तापमानामुळे पक्षी, प्राण्यांचे जनजीवन विस्कळीत होताना दिसतेय. तसेच अनेक पक्षी, प्राणी उष्णतेनं दगावले गेले आहेत. यासाठी गॅलरीत, खिडकीत पक्षांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तजवीज करून ठेवावी, असं हवामान अभ्यासकांनी सांगितलंय (Heat Wave)

राज्यात 15 आणि 16 एप्रिल रोजी तापमानात वाढ झाली होती. मुंबई, रायगड आणि ठाणे येथे 27 आणि 28 एप्रिलला तापामानात वाढ होणार आहे. मुंबईसह नवी मुंबईमध्ये तापमान हे 41 अंश सेल्सिअस होते. पुन्हा एकदा तिच परिस्थिती पाहायला मिळणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड या तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला. तसेच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी हवामान विभागाने सल्ला दिलाय.

हवामान विभागने दिला सल्ला

हवामान विभागाने नागरिकांना उन्हात उभं राहण्यापासून टाळा, सावलीचा आसरा घ्या, झाडाखाली उभं राहिलं तर उत्तमच, पुरेसे पाणी प्या, सैल कॉटनचे कपडे घाला, दुपारच्यावेळी चेहरा झाकून घ्या, टोपी घाला, छत्री वापरा, असा सल्ला देण्यात आला.

News Title – Heat Wave In Maharashtra State In Mumbai, Thane And Raigad District

महत्त्वाच्या बातम्या

मी स्वत:ला पुरस्कारासाठी कधीच पात्र समजत नाही; अमिताभ बच्चन असं का म्हणाले?

येत्या तीन दिवसांत वातावरणात मोठा बदल होणार; ‘या’ भागांना हायअलर्ट

“आधी म्हणाले बायको शेती करते, आता म्हणतात पत्नीच्या नावावर 2 दारु विक्रीचे परवाने”

सोन्याचे भाव रॉकेटच्या तेजीत; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

“देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर महाराष्ट्रात…”; शरद पवारांचा थेट हल्लाबोल