“देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर महाराष्ट्रात…”; शरद पवारांचा थेट हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | लोकसभा निवडणुकांमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवरच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत टीका केली. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते. यावेळी शिवसेना-भाजपची युती, महाराष्ट्रातील राजकारण या विषयांवर पवार बोलताना दिसून आले.

काय म्हणाले शरद पवार?

‘तुम्ही भाजप आणि शिवसेनेची युती तोडून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. त्यावेळी शिवसेनेला मोदी-फडणवीसांच्या नावाने मतं मिळाली होती.’, असा प्रश्न शरद पवारांना करण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

‘भाजप आणि शिवसेना 25 वर्षे एकत्र होते. त्यावेळी काही ते मोदी आणि अमित शाह यांच्या नावाने निवडणूक लढवत नव्हते. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने निवडणूक लढवत होते. त्यांना ज्या जागा मिळत होत्या त्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मिळत होत्या.’, असं शरद पवार म्हणाले.

पुढे त्यांनी चंद्रकांत खैरे यांचं नाव घेत अजून एक किस्सा सांगितला. माझी छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) सभा आहे. इथे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आहेत. खैरे सुतार समाजाचे आहेत.सुतार समाजाची किती मतं असतील तिथे? जास्तीत जास्त तीन हजार.. चार हजार.. तर ते तीन वेळेला आमदार, चार वेळेला खासदार होऊ शकले. असं सांगत पवार (Sharad Pawar ) यांनी मोदी-शाह यांच्यावर निशाणा साधला.

शरद पवारांचा फडणवीसांवर निशाणा

ज्याच्याकडे तीन-चार हजार कौटुंबिक मतं नाहीत ती व्यक्ती इतक्या वेळा येऊ शकते याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठिशी उभे होते आणि अशा लहान थरातील लोकांना सुद्धा बाळासाहेबांनी मोठं केलं. हे अमित शाह किंवा मोदींनी असं केलेलं नाही. असा टोला लगावत शरद पवार (Sharad Pawar ) यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस यांना डिवचलं.

शिवसेना ही प्रचंड कार्यकर्त्यांच संच असलेल्या लोकांचं संघटन होतं. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी जी संघटना निर्माण केली त्या संघटनेने समाजातील लहान-लहान घटकांना आत्मविश्वास दिला.किंबहुना मी सुद्धा तो देऊ शकलो नाही. असंही शरद पवार म्हणाले.

News Title : Sharad Pawar on Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या-

“शिरुरमधून छगन भुजबळांना उमेदवारी…”, नव्या दाव्याने खळबळ

येत्या महिन्यात ‘या’ दोन राशी होणार सर्वात श्रीमंत

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

रणबीर कपूर सोबतच्या नात्याबाबत कतरिनाने केला खुलासा, म्हणाली…

“…तर मी राजकारणातून संन्यास घेईल”, महादेव जानकरांची मोठी घोषणा