येत्या महिन्यात ‘या’ दोन राशी होणार सर्वात श्रीमंत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Today Horoscope l मेष:- स्वत:ला आवडत्या कामात गुंतवून घ्यावे. मनातील चुकीचे विचार काढून टाका. कामाचा ताण वाढला तरी फायद्यात राहाल. चांगला व्यावसायिक लाभ मिळेल. गजलक्ष्मी राजयोग होत असल्याने मेष राशीच्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. शुभ रंग पांढरा, शुभ अंक २

वृषभ:- कामात सुसंगती आल्याने थोडा आराम करू शकाल. कौटुंबिक जबाबदारी अंगावर पडेल. प्रिय व्यक्तीची आवड पूर्ण करावी लागेल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक ८

मिथुन:- आपले विचार उत्तमरीत्या मांडाल. नसत्या शंका मनात आणू नका. व्यावसायिक कामात स्पष्टता ठेवावी. वैचारिक गोंधळ घालू नका. हसत-हसत आपले मत मांडावे. शुभ रंग पोपटी, शुभ अंक ४

कर्क:- चोरांपासून सावध राहावे. मित्रांशी पैज लावाल. आपला संयम ढळू देऊ नका. बचत करण्यावर अधिक भर द्यावा. कौटुंबिक गरजा ध्यानात घ्या. कर्क राशीच्या लोकांना गजलक्ष्मी राजयोग बनल्याने चांगले दिवस अनुभवता येऊ शकतात. शुभ रंग विटकरी, शुभ अंक १

Today Horoscope l सिंह:- चर्चेला अधिक वाव द्यावा. तरुण मित्रांच्यात वावराल. नवीन ओळखी होतील. अनुभवी लोकांचा सल्ला विचारात घ्यावा. व्यापारातून चांगला लाभ संभवतो. शुभ रंग जांभळा, शुभ अंक ९

कन्या:- काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. जवळचा प्रवास करावा लागेल. कमिशन मधून चांगला लाभ कमवाल. कुटुंबाला पर्याप्त वेळ द्यावा. शुभ रंग लाल, शुभ अंक ७

तूळ:- घरातील गोष्टींमध्ये अडकून पडाल. काही गोष्टींबाबत आग्रही राहाल. दीर्घकालीन फायद्याचा विचार कराल. नातेवाईकांवर आपली मते लादू नका. शुभ रंग निळा, शुभ अंक १

वृश्चिक:- सकारात्मक धोरण ठेवावे. कौटुंबिक खर्चाचा अधिक विचार कराल. इतरांना दुखवू नका. ताळमेळ साधत कामे करावी लागतील. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. शुभ रंग हिरवा, शुभ अंक ३

धनू:- मानसिक स्थैर्य जपावे. आलेल्या अनुभवातून काहीतरी शिकण्यास मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे मत मान्य करावे लागेल. जुन्या कामातून यश मिळेल. जोडीदाराचे कौतुक केले जाईल. शुभ रंग पिवळा, शुभ अंक ८

मकर:- जुन्या विचारात अडकून पडू नका. मनातील निराशा झटकून टाका. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. प्रवासात काळजी घ्यावी. घरातील बदलात ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. शुभ रंग काळा, शुभ अंक १

कुंभ:- ध्यानधारणा व योगाचा तुम्हाला फायदा होईल. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका. खेळीमेळीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. बोलण्यातून इतरांना दुखवू नका. घरात टापटीप ठेवाल. शुभ रंग नारंगी, शुभ अंक ६

Today Horoscope l मीन:- उगाचच लहान सहान गोष्टींवरून चिडू नका. कलात्मक काम तुम्हाला आनंद देईल. नव्या संकल्पना फलद्रुप होतील. घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल. आवडत्या छंदाला वेळ काढाल. शुभ रंग लाल, शुभ अंक ९

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

रणबीर कपूर सोबतच्या नात्याबाबत कतरिनाने केला खुलासा, म्हणाली…

“…तर मी राजकारणातून संन्यास घेईल”, महादेव जानकरांची मोठी घोषणा

‘…तर पुढे काही घडू शकतं’; पवारांसोबत जाण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

इतक्या वर्षांनंतर आमिर खानचा मोठा खुलासा, म्हणाला ‘वेळ खूप…’