“शिरुरमधून छगन भुजबळांना उमेदवारी…”, नव्या दाव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shirur Loksabha l राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेतेमंडळी एकमेकांवर सरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच महाविकास आघाडीचे शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच अमोल कोल्हेंनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

छगन भुजबळांनी ऑफर नाकारली :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरुर लोकसभा मतदार संघातून माझ्या विरोधात छगन भुजबळांना उमेदवारी देणार होते असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी छगन भुजबळ यांना ही ऑफर दिल्यास भुजबळांनी शिरुरमधून लढण्यास नकार दिला आहे. त्यानंतर मग त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

तसेच जे उमेदवार बेडूक उड्या घेऊन आजवर ज्यांच्यावर आरोप करत होते, त्याच अजित पवारांच्या गटात जाऊन बसले आहेत. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटलांविषयी फार जास्त बोलणं उचित राहणार नाही. ते पहिल्या पसंतीचे उमेदवार असते तर नक्कीच मी शिवाजीराव आढळरावांवर भाष्य केलं असतं अशा शब्दांत अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांची थेट खिल्लीच उडवली आहे.

Shirur Loksabha l राजकीय पक्षाचे नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करण्यात व्यस्त :

सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिरुरच राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करण्यात व्यस्त आहेत. यासोबतच लोकसभा उमेदवारांसह कार्यकर्ते देखील ऐकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच शिरुर लोकसभा मतदारसंघात देखील बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु आहे.

महाविकास आघाडीकडून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देखील हेच दोन उमेदवार आमने सामने आले होते. अशातच यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये देखील याच दोन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

News Title – Amol kolhe on Shirur Loksabha

महत्त्वाच्या बातम्या

येत्या महिन्यात ‘या’ दोन राशी होणार सर्वात श्रीमंत

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

रणबीर कपूर सोबतच्या नात्याबाबत कतरिनाने केला खुलासा, म्हणाली…

“…तर मी राजकारणातून संन्यास घेईल”, महादेव जानकरांची मोठी घोषणा

‘…तर पुढे काही घडू शकतं’; पवारांसोबत जाण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य