दुःखद घटना! ऐन निवडणुकीत भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच निधन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

BJP l सध्या देशात निवडणुकांचे वारे फिरत असतानाच राजकीय वर्तुळातून एक दुःखत बातमी समोर येत आहे. हाथरसमधील भाजप खासदार राजवीर सिंग दिलर यांचे बुधवारी (२४ एप्रिल) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. खासदार दिलर हे त्यांच्या अलिगड येथील निवासस्थानी असताना अचानक बेशुद्ध पडले. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. खासदार राजवीर सिंग दिलर यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

खासदार राजवीर सिंग दिलर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले

राजवीर सिंग दिलर 2019 मध्ये हातरस लोकसभा मतदारसंघातून 2.60 लाख मतांनी विजयी झाले होते. पक्षाने 2024 च्या निवडणुकीसाठी त्यांचे तिकीट रद्द केले होते. त्यांच्या जागी महसूल राज्यमंत्री अनूप वाल्मिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिकीट नाकारल्यानंतर देखील राजवीर सिंग दिलर हे सतत पक्षाचे काम करत होते. हातरस आणि अलीगढच्या कार्यक्रमात सहभागी होत होते.

दोन दिवसांपूर्वी अलिगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत ते मंचावर होते. राजवीर सिंग दिलर यांचे वडील किशनलाल दिलर हे देखील भाजपचे दिग्गज नेते होते. ते सलग पाच वेळा आमदार आणि चार वेळा खासदार होते. राजवीर दिलर यांच्या निधनाच्या वृत्ताने परिसरात शोककळा पसरली आहे.

BJP l राजवीर दिलरला कशाची चिंता होती? :

राजवीर दिलर यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजवीर दिलर हातरस मतदारसंघातून विजयी झाले होते, पण यावेळी निवडणुकीत पक्षाने राजवीर दिलर यांचे तिकीट रद्द करून अनुप वाल्मिकी यांना हातरस मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. असे सांगितले जात आहे की हातरसच्या प्रबळ दावेदारांमध्ये नाव असूनही, दिलर तिकीट कापल्यामुळे खूप चिंतेत होते आणि त्यांची तब्येत खराब होती.

राजवीर सिंह दिलेर यांचे वडील किशन लाल दिलेर हे हाथरस लोकसभा मतदारसंघातून तब्बल चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी 1996, 1998, 1999 आणि 2004 च्या लोकसभा निवडणुकीत हाथरसच्या जागेवर विजयाची पताका फडकावले आहे. त्यामुळे दिलेर पिता-पुत्रांचं हाथरस लोकसभा मतदारसंघाशी एक वेगळं भावनिक नातं असल्याचं बोललं जात आहे.

News Title – Bjp Hathras Mp Rajveer Singh Diler Death Due To Heart Attack

महत्त्वाच्या बातम्या

“शिरुरमधून छगन भुजबळांना उमेदवारी…”, नव्या दाव्याने खळबळ

येत्या महिन्यात ‘या’ दोन राशी होणार सर्वात श्रीमंत

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

रणबीर कपूर सोबतच्या नात्याबाबत कतरिनाने केला खुलासा, म्हणाली…

“…तर मी राजकारणातून संन्यास घेईल”, महादेव जानकरांची मोठी घोषणा