सोन्याचे भाव रॉकेटच्या तेजीत; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold-Silver Rate Today | मार्च आणि एप्रिल महिन्यात सोन्याचे भाव प्रचंड वाढताना दिसले. या महिन्यात दरवाढीचे अनेक रेकॉर्ड तुटले गेले. जागतिक बाजारातील घडामोड,राजकीय तणाव, चीनमधील मध्यमवर्गाची सोने-चांदीची तुफान खरेदी आणि देशातील अंतर्गत धोरणं या सर्व गोष्टींचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किंमतींवर दिसून आला.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात तब्बल 2140 रुपयांची वाढ झाली. 18 एप्रिल रोजी सोनं 330 रुपयांनी स्वस्त झालं. तर 20 एप्रिल रोजी 100 रुपयांनी किंमती उतरल्या. 22 एप्रिल रोजी पुन्हा 550 रुपयांची घसरण झाली. काल 24 एप्रिलरोजी पुन्हा त्यात 450 रुपयांची वाढ झाली.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोनं 66,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याचे भाव अजूनही रॉकेटच्या तेजीतच आहेत. ग्राहकांच्या खिशाला यामुळे चांगलीच झळ बसत आहे.

चांदीचे भाव उतरले.

सोनं तेजीत असलं तरी चांदीने काही अंशी दिलासा दिला आहे. 18, 19 आणि 20 एप्रिल रोजी चांदीच्या किंमतीत बदल झाला नाही. या आठवड्यात 22 एप्रिल रोजी चांदीचे 1 हजारांनी भाव घसरले. 23 एप्रिल रोजी 2500 रुपयांनी भाव उतरले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 82,900 रुपये आहे.

‘असा’ असेल कॅरेटचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA),24 कॅरेट सोनं 71,826 रुपये, 23 कॅरेट 71,538 रुपये, 22 कॅरेट सोनं 65,793 रुपये झाले. 18 कॅरेट 53,870 रुपये, 14 कॅरेट सोनं 42,018 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय (Gold-Silver Rate Today) बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title : Gold-Silver Rate Today April 25 

महत्त्वाच्या बातम्या-

“देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर महाराष्ट्रात…”; शरद पवारांचा थेट हल्लाबोल

कोटक बँकेवर झालेल्या कारवाईनंतर ग्राहकांवर काय परिणाम होणार?

दुःखद घटना! ऐन निवडणुकीत भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच निधन

“शिरुरमधून छगन भुजबळांना उमेदवारी…”, नव्या दाव्याने खळबळ

येत्या महिन्यात ‘या’ दोन राशी होणार सर्वात श्रीमंत