राहुल गांधींच्या तोंडी पुन्हा ऐश्वर्या राय बच्चनचं नाव, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  व्हायरल होताना दिसत आहे. यामुळे त्यांच्यावर देशभरातून टीका होताना दिसत आहे. त्यावरून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला राजकारणात रस नाही, मी गंभीर नाही, असं ते मीडियासमोर बोलायचे”, असं म्हणत त्यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि विराटचं नाव घेत त्यांचा उल्लेख केला.

काय म्हणाले राहुल गांधी?

“माझ्याबद्दल ते मीडियात म्हणायचे की मला राजकारणात रस नाही. मी राजकारणाविषयी गंभीर नाही. त्यांच्यासाठी मनरेगा आणि भूसंपादन विधेयकाबाबत लढणारा गंभीर नाही, तर ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि विराट कोहली यांच्याविषयी बोलणारा गंभीर आहे का?” असा सवाल केला आहे. ते दिल्लीतील सामाजिक न्याय संमेलनात बोलत होते. (Rahul Gandhi)

काही लोकं मुद्द्यावर चर्चा करतात आणि मत व्यक्त करतात. पण 90 टक्के लोक काय विचार करतात. याबद्दल कोणीच काही बोलत नाही. मी त्या इतर 90 टक्के लोकांबाबत बोलत असतो, म्हणून मला मी गंभीर नसल्याचं बोललं जातंय. मीडियात देखील एकही आदिवासी, दलित, ओबीसी अँकर नसल्याचं राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणालेत.

राहुल गांधींकडून याआधी ऐश्वर्या रायचा उल्लेख

याआधी देखील राहुल गांधी यांनी ऐश्वर्या रायबाबत वक्तव्य केलं होतं. तसेच त्यांनी आयोध्येतील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी “मी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अंबानी, अदानी अशा लोकांना पाहिलं. मात्र मला ओबीसी, शेतकरी, गरीब, बेरोजगार व्यक्तीची त्या सोहळ्याला उपस्थिती नव्हती, असा टोला लगावला होता.

दुसऱ्या एका रॅलीतही त्यांनी ऐश्वर्या रायबद्दल वक्तव्य केलं होतं. “ऐश्वर्या राय डान्स करताना दिसेल आणि अमिताभ बच्चन हे बल्ले बल्ले करताना दिसतील”, असं  त्यांनी म्हटलं होतं.

News Title – Rahul Gandhi Mentioned Name Amitabh Bachchan, Aishwarya Rai And Virat Kohli

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट; भुजबळांच्या माघारीनंतर भाजपकडून थेट ‘हा’ नेता मैदानात?

बँकेची कामे लवकरात लवकर उरकून घ्या; मे महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद

‘त्या’ प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत; संजय दत्तचेही नाव समोर आल्याने खळबळ

पुरुषांपेक्षा महिला डॅाक्टरांनी उपचार केल्यास मृत्यू दरात घट, नव्या अभ्यासातून खुलासा

450 ग्रॅम सोनं अन् 4 किलो चांदी; पंकजा मुंडेंकडे एकूण संपत्ती किती?