450 ग्रॅम सोनं अन् 4 किलो चांदी; पंकजा मुंडेंकडे एकूण संपत्ती किती?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pankaja Munde | बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलंय. त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुंडे भगिनींनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची विधीवत पूजा करत आपला अर्ज भरला. यावेळी त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन, गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचेही दर्शन घेतले.

बीडमध्ये पंकजा मुंडे यांना महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांचं आव्हान असणार आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून इथे जोरदार प्रचारसभा घेण्यात येत आहेत. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असलेल्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या संपत्तीसंदर्भातील तपशील उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिला आहे. त्यातून त्यांची एकूण संपत्ती समोर आली आहे.

पंकजा मुंडे यांची एकूण संपत्ती

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडे एकूण 10 कोटी 62 लाख 83 हजार रुपये इतकी संपत्ती असल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिली आहे. पंकजा मुंडे व त्यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांची दोघांची एकूण 46 कोटी 11 लाख 33 हजार 967 रुपयांची संपत्ती आहे.

पंकजा मुंडे यांच्याकडे 32 लाख 85 हजाराचे 450 ग्रॅम सोने तर तीन लाख 28 हजार रुपयांची चार किलो चांदी आहे. दोन लाख तीस हजारांचे इतर दागिने देखील आहेत. त्यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्याकडे 13 लाखांचे 200 ग्रॅम सोने आणि एक लाख 38 हजार रुपयांची दोन किलो चांदी आहे.

पंकजा यांनी त्यांची स्थावर मालमत्ता 4 कोटी 45 लाख 24 हजार 760 रुपये असल्याची माहिती दिली आहे. तर, 6 कोटी 17 लाख 58 हजार 708 रुपये स्थूल मालमत्ता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्यावर कर्जही आहे.

पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून 65 लाख तर यशश्री मुंडे यांच्याकडून 35 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. पंकजा मुंडे आणि त्यांचे पती चारुदत्त पालवे यांचे एकत्रित कर्ज 9 कोटी 94 लाखांनी वाढल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पंकजा यांच्यावर 2 कोटी 74 लाख 89 हजार 518 रुपये इतके कर्ज आहे.

News Title : Pankaja Munde net worth revealed

महत्त्वाच्या बातम्या-

येत्या तीन दिवसांत वातावरणात मोठा बदल होणार; ‘या’ भागांना हायअलर्ट

“आधी म्हणाले बायको शेती करते, आता म्हणतात पत्नीच्या नावावर 2 दारु विक्रीचे परवाने”

सोन्याचे भाव रॉकेटच्या तेजीत; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

“देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर महाराष्ट्रात…”; शरद पवारांचा थेट हल्लाबोल

कोटक बँकेवर झालेल्या कारवाईनंतर ग्राहकांवर काय परिणाम होणार?