पुरुषांपेक्षा महिला डॅाक्टरांनी उपचार केल्यास मृत्यू दरात घट, नव्या अभ्यासातून खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Female Doctors l आजकाल सर्वच क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. अगदी मेडिकल क्षेत्रातही महिलांचं प्रमाण वाढत चाललं आहे. यासंदर्भात एक रिसर्च करण्यात आला आहे. एका अहवालानुसार एक माहिती समोर आली आहे.

महिला डॉक्टरांनी रूग्णावर उपचार करणे फायद्याचे :

पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी रूग्णावर उपचार केला तर रुग्ण वाचण्याची शक्यता जास्त असते. कारण महिलांनी उपचार केलेले रुग्ण लवकर बरे होतात. किंवा त्यांच्या मृत्यूचे प्रमाण देखील कमी होते असा एक रिपोर्ट सध्या समोर आला आहे.

एका अभ्यासानुसार असे समोर आले आहे की, पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रुग्णांपेक्षा महिला डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रूग्णांचा मृत्यू किंवा रुग्ण दवाखान्यात पुन्हा दाखल होण्याचं प्रमाण कमी असल्याचं समोर आलं आहे. हा अभ्यास तब्बल 7,76,00 रुग्णांवर करण्यात आला होता. त्यामध्ये एकूण 4,58,100 महिला आणि सुमारे 3,18,000 रुग्ण पुरुष होते. या सर्व रूग्णांना 2016 ते 2019 दरम्यान दाखल करण्यात आलं होतं.

Female Doctors l अभ्यासातून काय निष्कर्ष निघाला?

यासंदर्भात अभ्यास पूर्ण झाल्यावर अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, महिला डॉक्टरांद्वारे उपचार केल्यावर रुग्णांचा मृत्यू आणि रूग्णालयात पुन्हा भरती होण्याचे प्रमाण कमी होते. तसेच जर महिला डॉक्टरांद्वारे उपचार केल्यावर महिला रुग्णांचा मृत्यू दर 8.15 टक्के असल्याचे समोर आले आहे, तर पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार केल्यावर मृत्यू दर 8.38 टक्के आहे. तसेच महिला डॉक्टरांद्वारे उपचार केल्यावर पुरुष रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 10.15 टक्के आहे. तर पुरुष डॉक्टरांकडून उपचार केल्यावर मृत्यूचे प्रमाण 10.23 टक्के होते.

अहवालात असं सांगण्यात आलं आहे की, पुरुष असो किंवा महिला प्रत्येकाला महिला डॉक्टरांच्या उपचाराचा फायदा झाल्याचं दिसून येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार महिला डॉक्टर पुरुष रुग्णांसोबत जास्त वेळ घालवतात आणि त्यांच्या रेकॉर्ड आणि परफॉर्मंसची काळजी देखील जास्त घेतात. याशिवाय 2002 मध्ये झालेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, महिला डॉक्टरांनी रुग्णासोबत सरासरी 23 मिनिटे घालवली आहेत, तर पुरुष डॉक्टरांनी 21 मिनिटं घालवली आहेत. त्यामुळे रुग्णावर महिलांनी उपचार केल्यास त्यांचे आरोग्य देखील सुधारते.

News Title : Reduction in mortality after treatment by female doctors compared to men

महत्त्वाच्या बातम्या-

450 ग्रॅम सोनं अन् 4 किलो चांदी; पंकजा मुंडेंकडे एकूण संपत्ती किती?

मी स्वत:ला पुरस्कारासाठी कधीच पात्र समजत नाही; अमिताभ बच्चन असं का म्हणाले?

येत्या तीन दिवसांत वातावरणात मोठा बदल होणार; ‘या’ भागांना हायअलर्ट

“आधी म्हणाले बायको शेती करते, आता म्हणतात पत्नीच्या नावावर 2 दारु विक्रीचे परवाने”

सोन्याचे भाव रॉकेटच्या तेजीत; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर