‘त्या’ प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत; संजय दत्तचेही नाव समोर आल्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Tamannaah Bhatia | देशात सध्या आयपीएल 2024 ची धूम सुरू आहे. चाहते आयपीएलच्या सामन्यांचा आनंद लूटताना दिसत आहेत. अशात अनेक वेबसाइट्सवर आयपीएलचे बेकायदेशीर स्ट्रीमिंग करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत सापडली आहे.

याप्रकरणी नुकतेच अभिनेता संजय दत्तला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्याचबरोबर आता अभिनेत्री तमन्ना भाटिया हिलाही समन्स बजावण्यात आलं आहे. महाराष्ट्र सायबर सेलने हे समन्स बजावले आहेत. तमन्नाने फेअरप्ले ॲपसाठी जाहिरात केली होती. त्यामुळे तिला समन्स देण्यात आलंय.

IPL च्या अवैध स्ट्रीमिंग प्रकरणी अभिनेत्री अडचणीत

फेअरप्ले ॲपवर आयपीएलची बेकायदेशीर स्ट्रीमिंग केल्याने ‘वायकॉम 18’ समुहाला मोठा फटका बसला आहे.त्यामुळे समुहाच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सायबर सेलने तमन्नाला समन्स बजावले आहेत. तिला चौकशीसाठी सायबर तपास अधिकाऱ्यांसमोर 29 एप्रिल रोजी हजर राहावं लागणार आहे. याच प्रकरणात अभिनेता संजय दत्तलाही 23 एप्रिल रोजी समन्स बजावण्यात आले होते.

मात्र, या दिवशी भारतात नसल्यामुळे तो गैरहजर राहिला होता. आपला जबाब नोंदवण्यासाठी त्याने सायबर सेलकडे आणखी वेळ मागितला आहे. काही मिडिया रिपोर्टनुसार फेअरप्ले ॲपवर आयपीएलचे सामने बेकायदेशीरपणे स्ट्रीम केले जात होते आणि या सट्टेबाजीच्या ॲपला प्रमोट करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये तमन्ना भाटियाचाही (Tamannaah Bhatia) समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

आयपीएलच्या सामन्यांच्या स्ट्रीमिंगचे हक्क ‘वायकॉम 18’ यांच्याकडे आहेत. मात्र फेअरप्ले नावाच्या ॲपवर याचे अवैध स्ट्रिमिंग करण्यात आले. याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली. याच प्रकरणी संजय दत्त आणि तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) अडचणीत आले आहेत.

फेअरप्ले ही ‘महादेव’ ऑनलाइन गेमिंग ॲपची उपकंपनी असून यावर क्रिकेट, पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल यांसारख्या विविध खेळांवर बेकायदेशीरपणे सट्टेबाजी केली जाते. मागच्या वर्षी या ॲपवरही कारवाई करण्यात आली होती. त्या प्रकरणी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अडचणी सापडले होते. कारण, त्यांनी याच्या जाहिराती केल्या होत्या. आता संजय दत्त आणि तमन्ना भाटिया यांचं नाव समोर आलं आहे.

News Title :  Tamannaah Bhatia Gets Summons for Illegal IPL Streaming App case

महत्त्वाच्या बातम्या-

450 ग्रॅम सोनं अन् 4 किलो चांदी; पंकजा मुंडेंकडे एकूण संपत्ती किती?

मी स्वत:ला पुरस्कारासाठी कधीच पात्र समजत नाही; अमिताभ बच्चन असं का म्हणाले?

येत्या तीन दिवसांत वातावरणात मोठा बदल होणार; ‘या’ भागांना हायअलर्ट

“आधी म्हणाले बायको शेती करते, आता म्हणतात पत्नीच्या नावावर 2 दारु विक्रीचे परवाने”

सोन्याचे भाव रॉकेटच्या तेजीत; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर