येत्या तीन दिवसांत वातावरणात मोठा बदल होणार; ‘या’ भागांना हायअलर्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update Today | या दोन-तीन दिवसांत विदर्भ तसंच मराठवाड्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. येथे पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर, मुंबई आणि पुण्याला उष्णतेचा हायअलर्ट देण्यात आला आहे. राज्यात कुठे उष्णतेच्या लाटा तर कुठे अवकाळी पाऊस असं दृश दिसून येत आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, द्रोणिका रेषा आज मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत कर्नाटक मधून जात आहे. त्यामुळे कोकण ,गोव्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे, तसेच कोकण गोव्यात पुढील 3 दिवस तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये पुढील पाच ते सहा दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा

तर, पुण्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. मुंबईमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून आता पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथे 28 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट (Weather Update Today ) देण्यात आला आहे.

‘या’ भागांना अवकाळीचा इशारा

हवामान विभागाने राज्यातील औरंगाबाद, जालना, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर, नागपूर, चंद्रपूर, वर्धा येथे गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्याचा पाऊस पडत आहे. यामुळे वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्ये पुढील (Weather Update Today ) पाच ते सहा दिवस तुरळक ठिकाणी वादळी वारा व पाऊस पडण्याची शक्यता असून येथे वादळी वाऱ्याची गती ताशी 40 ते 50 किलोमीटर इतकी राहील. तुरळक ठिकाणी गरपीटदेखील होऊ शकते.

News Title :  Weather Update Today

महत्त्वाच्या बातम्या-

“आधी म्हणाले बायको शेती करते, आता म्हणतात पत्नीच्या नावावर 2 दारु विक्रीचे परवाने”

सोन्याचे भाव रॉकेटच्या तेजीत; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

“देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर महाराष्ट्रात…”; शरद पवारांचा थेट हल्लाबोल

कोटक बँकेवर झालेल्या कारवाईनंतर ग्राहकांवर काय परिणाम होणार?

दुःखद घटना! ऐन निवडणुकीत भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच निधन