नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट; भुजबळांच्या माघारीनंतर भाजपकडून थेट ‘हा’ नेता मैदानात?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nashik Lok Sabha | नाशिकच्या जागेवरून महायुतीच्या गोट्यात सध्या तिढा निर्माण झाला आहे. नाशकात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, महायुतीत या जागेवरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे.

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ या जागेसाठी आग्रही होते. मात्र, त्यांनी नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून जाहीर माघार घेतली. भुजबळांच्या घोषणेनंतर महायुतीकडून नव्या ओबीसी चेहऱ्याचा शोध सुरु असल्याचं म्हटलं जातंय. अशात या जागेबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

भाजपाकडून बीडमध्ये पंकजा मुंडे यांना या निवडणुकीत संधी देण्यात आली आहे. अशात प्रितम मुंडे यांचं काय?, असा प्रश्न साहजिक निर्माण झाला. याबाबत पंकजा मुंडे एक मोठं वक्तव्य केलं. ‘प्रितम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही, तिचं कुठेही अडणार नाही, मी तिला नाशिकमधून उभी करेन.’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्यांच्या विधानामुळे आता नाशकात प्रितम मुंडेंना संधी दिली जाण्याची जोरदार चर्चा राजकीय (Nashik Lok Sabha) वर्तुळात सुरू आहे.

नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील सतत भेटी घेतल्या. असं असूनही या जागेवर महायुतीकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. त्यातच शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी हेमंत गोडसेंच्या नावाला काही अडचण असल्यास मी देखील इच्छुक आहे, असं म्हणत या जागेबाबत अजूनच ट्विस्ट वाढवला.

नाशकात प्रितम मुंडेंना संधी?

त्यामुळे नाशिकची जागा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तीनही पक्षांसाठी आता प्रतिष्ठेचा विषय बनल्याचं राजकारणात म्हटलं जातंय. अशात पंकजा मुंडे यांनी प्रितम मुंडे यांच्याबाबत जाहीरपणे केलेलं वक्तव्यं चर्चेत आलं आहे. आता भाजपकडून प्रीतम मुंडे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी छगन भुजबळ यांनी नाशिकमधून माघार घेतली असली तरी आमचा दावा कायम असल्याचं मागे म्हटलं होतं. त्यात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेदेखील उमेदवारीसाठी जोर लावताना दिसून येत आहेत. अशात प्रितम मुंडे याच बाजी मारणार काय?, अशाही (Nashik Lok Sabha) चर्चा आता रंगल्या आहेत.

News Title : talk of Pritam Munde getting a chance in Nashik Lok Sabha constituency

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्या’ प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत; संजय दत्तचेही नाव समोर आल्याने खळबळ

पुरुषांपेक्षा महिला डॅाक्टरांनी उपचार केल्यास मृत्यू दरात घट, नव्या अभ्यासातून खुलासा

450 ग्रॅम सोनं अन् 4 किलो चांदी; पंकजा मुंडेंकडे एकूण संपत्ती किती?

मी स्वत:ला पुरस्कारासाठी कधीच पात्र समजत नाही; अमिताभ बच्चन असं का म्हणाले?

येत्या तीन दिवसांत वातावरणात मोठा बदल होणार; ‘या’ भागांना हायअलर्ट