चिन्मय मांडलेकरच्या लेकासाठी सुप्रिया पिळगावकरांची पोस्ट, म्हणाल्या…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chinmay Mandlekar Trolling। गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर याने मोठा निर्णय घेतला. आपल्या मुलाचं नाव हे जहांगीर ठेवलं आहे. त्यावरून त्याला आणि त्याच्या पत्नीला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यामुळे माझं कुटुंब मानसिक दडपणातून जात असल्याने मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणं सोडणार असल्याचा त्याने निर्णय घेतला. यावर आता अनेकांनी विरोध करायला सुरूवात केली आहे. तर मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या काही कलाकारांनी नेटकऱ्यांना सुनावलंय. अशातच आता अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी चिन्मय मांडलेकरला पाठिंबा दिल्याबाबत एक पोस्ट शेअर केलीये. (Chinmay Mandlekar Trolling)

दरम्यान, काही दिवासांआधी चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar Trolling) यांना मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडेनं पाठिंबा दिला. चिन्मय दादा आम्ही तुझ्या पाठिशी आहोत अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. अशातच आता अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी “जहांगीर तुला, अनेकानेक शुभाशिर्वाद”, अशी पोस्ट शेअर केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारतात. मुलाचं नाव जहांगीर ठेवतात, अशी नेटकऱ्यांनी टीका केली. (Chinmay Mandlekar Trolling)

या टीकेनंतर चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यातून नेटकऱ्यांना बरोबर उत्तर दिलं होतं. जहांगीर या नावाचा नेमका अर्थ काय? याचं प्रत्युत्तर त्या व्हिडीओच्या माध्यमातून दिलं गेलं.

सुप्रिया पिळगावकर यांची पोस्ट चर्चेत

Supriya Pilgaonkar post

 

काय म्हणाला होता चिन्मय मांडलेकर?

मी पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो. माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे. यामुळे माझ्या कुटुंबाला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका न करण्याचा निर्णय चिन्मयने घेतला. (Chinmay Mandlekar Trolling)

“मी आतापर्यंत सहा चित्रपटात महारांजांची भूमिका साकारली. तरीही माझ्या मुलाचं नाव हे जहांगीर का? असा ट्रोलिंगचा प्रमुख सुर आहे. माझ्या मुलाचा जन्म हा 2013 चा आहे तो आता 11 वर्षांचा झाला. तेव्हा कधी ट्रोलिंग नाही झालं. मला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेनं अनेक काही दिलं आहे.”

“महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या, देशाबाहेरच्या अनेक मराठी, अमराठी लोकं देखील मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनं ओळखतात. मात्र माझ्या कुटुंबाला याचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की यापुढे मी ही भूमिका साकारणार नाही. कारण मी करत असलेली भूमिका एक वडील म्हणून, नवरा म्हणून, कुटुंबप्रमुख म्हणून फार महत्त्वाची आहे”, असं चिन्मयने व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त होत सांगितलं.

News Title – Chinmay Mandlekar Trolling Against Supriya Pilgaonkar Support

महत्त्वाच्या बातम्या

“आधी म्हणाले बायको शेती करते, आता म्हणतात पत्नीच्या नावावर 2 दारु विक्रीचे परवाने”

सोन्याचे भाव रॉकेटच्या तेजीत; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

“देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर महाराष्ट्रात…”; शरद पवारांचा थेट हल्लाबोल

कोटक बँकेवर झालेल्या कारवाईनंतर ग्राहकांवर काय परिणाम होणार?

दुःखद घटना! ऐन निवडणुकीत भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच निधन