गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबाराबाबत धक्कादायक माहिती समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Salman Khan | बाॅलिवूडचा भाईजान सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. 14 एप्रिल रोजी पहाटे सलमान खान घरात असताना त्याच्या घराबाहेर फायरिंग झाल्यावर सगळीकडे चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, या प्रकरणी माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तपास सुरु करत अवघ्या काही तासात आरोपींना ताब्यात घेतलं. आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोघांनी हल्ला केल्याचं समोर आलं आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्याकडून या घटनेची माहिती घेत आहेत. मात्र, आता या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय घडलं?

सलमान खानच्या (Salman Khan) गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या मागे नक्की कोणाचा हात आहे? हे तपासायचे आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. त्याचबरोबर युक्तिवादा दरम्यान सरकारी वकिलांनी म्हटलं की, तपासात असं समोर आलं आहे की, गोळीबारानंतर आरोपींनी तीन वेळा कपडे बदलले.

किती गोळ्या झाडल्या?

या वेळी वकिलांनी अणखी काही गोष्टींचा खुलासा केला. बोलत असताना वकील म्हणाले की, आरोपींनी फक्त कपडेच नाही तर त्यांनी चेहेरा देखील बदलण्याचा प्रयत्न केला. आपली ओळख लपवण्यासाठी आरोपी असे करत होते, हे देखील सांगण्यात आले.

आरोपींकडे एकूण 40 गोळ्या होत्या. त्यापैकी 5 गोळ्या सलमान खानच्या (Salman Khan)  घराबाहेर फायर करण्यात आल्या आणि 17 जप्त करण्यात आल्या आहेत. उरलेल्या गोळ्या नेमक्या कुठे आहेत?, याचाही शोध पोलिसांना करायचा आहे.

सलमानला घाबरवण्यासाठी गोळीबार-

सलमान खानला घाबरवण्यासाठी बिश्नोई गँगकडून आरोपींना त्याच्या घरावर गोळीबार करायला लावल्याची माहिती आहे. आरोपींना घरावर कमीत कमी दोन मॅगेझिन फायर करण्याचे टार्गेट दिले होते. 2 मॅगेझिन म्हणजेच 12 गोळ्या फायर करा, असा आदेश हल्लेखोरांना देण्यात आला होता.

News Title : Salman khan house firing shocking news

महत्त्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीचं नेमकं कारण काय?; शरद पवार स्पष्टच बोलले

अनंत गीते यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून प्रचंड विरोध; मतदारांनी बॅनरबाजी करत केला रोष व्यक्त

“पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी धनंजय मुंडेंचा डाव?”

मोठी बातमी! नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

चिन्मय मांडलेकरच्या लेकासाठी सुप्रिया पिळगावकरांची पोस्ट, म्हणाल्या…