अनंत गीते यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून प्रचंड विरोध; मतदारांनी बॅनरबाजी करत केला रोष व्यक्त

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

रायगड | गेली अनेक दिवस कोकणामध्ये चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे रायगड मतदार संघ. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून माजी खासदार अनंत गीते (Anant Geete) यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ कधीच सत्तेसोबत राहिलेला दिसून आला नाही, यामुळे या मतदारसंघातून यंदा कोण बाजी मारणार हे पाहणे? महत्त्वाचं ठरणार आहे.

या लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून सहा वेळा खासदार राहिलेले अनंत गीते (Anant Geete) यांच्यात लढत होत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे आणि अनंत गीते दोघांकडूनही जोरदार प्रचार सुरू आहे.

अनंत गीतेंना मतदारसंघात प्रचंड विरोध

अनंत गीते (Anant Geete) यांना मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र आहे. मतदारांकडून गीतेंना खडेबोल सुनावले जात आहे, अशातच गीतेंच्या विरोधात मतदारसंघात बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातील मोर्बा गावात मतदारांनी गीतेंच्या विरोधात बॅनरबाजी करत रोष व्यक्त केला. “अनंत गीते साहेब तुम्ही रायगड लोकसभेचे 30 वर्ष खासदार होतात, त्यावेळी तुम्ही आणि तुमचा विकास आमच्या मोर्बा गावापर्यंत पोहोचलाच नाही. परंतु तुम्ही आज आमच्या गावापर्यंत पोहोचत आहात, त्याबद्दल आपले सहर्ष स्वागत आहे..! एक मोर्ब्याचा मतदार…”, आशा आशयाचे बॅनर मतदारांकडून लावण्यात आले आहेत. रायगड लोकसभा मतदार संघात या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचे सहा वेळा प्रतिनिधित्व केले आहे. अनंत गीते या मतदारसंघातून १९९६ साली पहिल्यांदा निवडून गेले होते. त्यानंतर पाच वेळा त्यांनी रायगड लोकसभेचे प्रतिनिधित्व केले.

गीतेंनी ऊर्जा आणि अवजड उद्योग मंत्रालयाचा कारभारही त्यांनी सांभाळला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून ते पुन्हा रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. परंतु गीते (Anant Geete) साहेब तुम्ही सहा वेळा खासदार राहिलात, रायगडसाठी काय केले?, असा प्रश्न मतदारांकडून विचारला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी धनंजय मुंडेंचा डाव?”

मोठी बातमी! नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

चिन्मय मांडलेकरच्या लेकासाठी सुप्रिया पिळगावकरांची पोस्ट, म्हणाल्या…

एसी किंवा कूलरशिवायही घर होईल थंड; फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स

‘…म्हणून मी खूप शहाणा झालो असं नाही’; शरद पवारांनी सुजय विखेंना झापलं