“शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये…”; सुनंदा पवार यांचं खळबळजनक वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Loksabha | पहिल्या लोकसभा मतदानाचा टप्पा पार पडला आहे. दुसऱ्या मतदानाचा टप्पा हा काही तासांवर आहे. अशातच बारामती लोकसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर आलीये. बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातील गावांमध्ये धमकी, दादागिरी करत असल्याचा दावा शरद पवार गटातून होताना दिसत आहे. अशातच आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय. (Baramati Loksabha)

काय म्हणाल्या सुनंदा पवार?

“आज बारामतीच्या प्रत्येक गावामध्ये अनोळखी लोकं दिसत आहेत. वेगळ्या भाषेत बोलणारी लोकं दिसत आहेत. शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर होण्याची शक्यता आहे,” असं वक्तव्य सुनंदा पवार यांनी केलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त त्या बारामती येथील जळगाव सुपे येथे बोलत होत्या.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटातून सुनेत्रा पवार यांना निवडून देण्यासाठी बारामती मतदारसंघातील (Baramati Loksabha) खेडेगावातील लोकांना, शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचे, निधी न देण्याची धमकी अजित पवार देत असल्याचा दावा शरद पवार गटातून होताना दिसत आहे. अशातच आता बारामती लोकसभा (Baramati Loksabha) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कचाकच बटणं दाबा अन् निधी मिळवा, असं वक्तव्य केलं.

नणंद विरूद्ध भावजय काँटे की टक्कर

बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरूद्ध भाऊजय अशी लढत आहे. शरद पवार यांच्या गटातून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली  . बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी विजयाची हॅट्रीक केली आहे. तर आता अजित पवार यांच्या गटाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आलीये. अजित पवार यांचं कुटुंब सोडलं तर इतर पवार कुटुंबातील सदस्य हे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याबाजूने भूमिका घेताना दिसत आहे.

संपूर्ण पवार कुटुंबाने अजित पवार यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. तर रोहित पवार यांचे वडील आणि अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी देखील अजित पवार यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. असं असताना आता बारामतीकर कोणाला विजयाचा कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

News Title – Baramati Loksabha In Saunanda Pawar Big Allegation Claim of Use Of Money Last Two Day

महत्त्वाच्या बातम्या

“पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी धनंजय मुंडेंचा डाव?”

मोठी बातमी! नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

चिन्मय मांडलेकरच्या लेकासाठी सुप्रिया पिळगावकरांची पोस्ट, म्हणाल्या…

एसी किंवा कूलरशिवायही घर होईल थंड; फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स

‘…म्हणून मी खूप शहाणा झालो असं नाही’; शरद पवारांनी सुजय विखेंना झापलं