मनोज जरांगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला ( State government )(Maratha resevration) 40 दिवसांची मुदत दिली होती. येत्या 24 ऑक्टेबरला ही मुदत संपत आहे. अद्याप राज्य सरकारने मराठा आरक्षणावर भूमिका जाहिर केली नाही. त्यामुळे (Manoj jarange patil) मनोज जरांगे पाटील आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहेत. येत्या दोन दिवसात मुदत पुर्ण होईल. तत्पुर्वी जरांगे पाटालांनी आरक्षण मिळवण्यासाठी पुढील रणनिती जाहीर केली आहे. दोन दिवसात आरक्षणाचा निर्णय न झाल्यास येत्या 25 ऑक्टेबरपासून ते उपोषणाला बसणार आहेत.

आज मनोज जरांगे पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रणनिती जाहीर केली. जरांगे पाटील म्हणाले, सरकारने 30 दिवसांचा कालावधी मागितला होता. आम्ही 40 दिवसांचा कालावधी दिला. 24 ऑक्टोबर पर्यंत न्याय मिळाला नाही तर 25 ऑक्टोबरपासून उपोषण करणार आहे. तसेच गांवामध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करणार आहोत. नाक्यावर साखळी उपोषण करणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

प्रत्येक गावांमध्ये मराठा समाज एकत्र येईल आणि कॅंडल मार्च काढेल. गावांमध्ये साखळी उपोषणं आणि अंदोलनं करु. मराठा समाज शांत आहे. त्यांच्या भावनेशी खेळू नका. सरकारने वेळकाढूपणा करु नका. आता सहन करण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सरकाने निर्णय घ्यावा. मराठ्यांना सगळं समजतंय आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या