मुंबई | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केल्यानंतर आता या वादात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उडी घेतली आहे. रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केला आहे.
राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे प्रयत्न आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणामागे राजकीय शक्तीचा हात आहे, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे
मराठा समाज किती मागासलेला आहे याचा सर्व्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आणि सर्वोच्च न्यायालयाला ते पटलं तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं, असं रामदास कदम म्हणालेत.
मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या व्यक्तींचा सर्व्हे केला तर आत्महत्या केलेल्या व्यक्ती या मराठा समाजाच्या असल्याचंच दिसून येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- ‘मी फिरते मळ्यात….’; देवेंद्र फडणवीसांसाठी अमृता फडणवीसांनी घेतला उखाना
- बारामती जिंकू म्हणणाऱ्या बावनकुळेंना शरद पवारांनी पवारांनी दिलं सणसणीत उत्तर!
- मनोज जरांगेंना छगन भुजबळांनी दिली ऑफर, म्हणाले…
- रात्री 12 वाजताही जरांगे पाटलांच्या सभेला तूफान गर्दी!
- चहापानासाठी ‘इतक्या’ लाखांचा खर्च, आकडा वाचून थक्क व्हाल