रात्री 12 वाजताही जरांगे पाटलांच्या सभेला तूफान गर्दी!

बीड | मराठा आरक्षणावर( Marataha reservation ) मनोज जरांगे ( Manoj jarange patil ) पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरात त्यांच्या सभा पार पडत आहेत. मराठा बाधवांकडून त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बिडमधील मांजरसुंब्यात रात्री उशिरा 12 वाजता त्यांची सभा पार पडली. इतक्या उशिराही मोठ्या संख्येने मराठा बांधव त्यांच्या सभेसाठी जमले होते. प्रचंड गर्दी सभेला पाहायला मिळाली. जरांगे पाटालांनी राज्य सरकारला आरक्षण देण्यासाठी 40 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत 24 ऑक्टोबरला संपत आहे. मुदत संपत असल्याने आता जरांगे पाटालांनी राज्य सरकारच्या (State govenrment) विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

या सभेला संबोधित करताना जरांगे पाटील म्हणाले, बिडच्या भूमीपूत्राने आत्महत्या केली. आत्महत्या केल्याने प्रश्न मार्गी लागत नसतात. आता सरकारने आरक्षण गांभीर्याने घ्यावे. अन्यथा त्यांना महागात पडेल. सरकारला मराठ्यांनी गादीवर बसवलं आहे. आमच्या मुलांच्या आत्महत्या होत आहेत. आता बहाने करू नका. तिघांनी आणि सगळ्या मंत्रीमंडळाने गांभीर्याने घ्या. 24 तारखे नंतरचं आंदोलन सरकारला झेपणार नाही. आरक्षणासाठी सरकारला एक तासही ज्यादा देणार नाही, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.

सरकारने सगळ्या बाजूंनी घेरलं आहे. समिती आणखी किती पुरावे मागणार आहे. आता क्षमता संपली. मोदी साहेब (Narendra modi ) 26 तारखेला शिर्डीत येणार आहेत. त्यांना हात जोडून विनंती आहे, 25 तारीख उजाडू देऊ नका. सरकारला आरक्षण द्यायला सांगा. आमचं आंदोलन महागात पडेल. आपल्याला 40 आणि धनगर समाजाला 50 दिवसांची मुदत दिली आहे. आम्ही एकत्र आलो तर काय होईल बघा, अशा इशारा त्यांनी सरकारला दिला.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी 40 दिवसांची मुदत दिली आहे. येत्या 24 तारखेला ही मुदत संपत आहे. आज दुपारी दोन वाजता जरांगे पाटलांची पत्रकार परीषद होणार आहे. आरक्षणाविषयी ते आपली पुढची भूमिका मांडतील. त्यामुळे त्यांची पुढील भूमिका काय आसणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-