पुणे | ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) अखेर मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. 15 दिवसांपासून फरार असलेला ललित पाटीलला अटक केल्यानंतर त्यांनी त्याच्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले. ससून रुग्णालयातून मी पळून नाही गेलो मला पळवून लावलं, अशी धक्कादायक माहिती स्वत: ललितने दिली.
अटक केल्यानंतर ललितबाबत नवनविन माहिती समोर येत आहे. माध्यमांच्या माहितीनुसार ललित फरार झाला त्यावेळी त्यांनी कारने प्रवास केला. शिवाय त्यांनी स्वत:च्या फोनवरुन कोणालाही संपर्क साधाला नाही. दरम्यान ललितबद्दल एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.
ललित पाटील हा ससून रुग्णालयात केवळ नावालाच होता. त्याच्या नावावर अनेकवेळा हॉटेलमध्ये रुम बुक होती. तसेच रुग्णालयात आणि हॉटेलमध्ये त्याला कोण कोण भेटण्यास येत होतं, याची माहिती पोलिसांनी दिली. ड्रग्समधून मिळालेल्या पैशांतून ललित पाटील याने तब्बल आठ किलो सोनेही घेतल्याचं तपासातून समोर आलं आहे.
कैदी ललित पाटील यांनी याच्यावर ससून रुग्णालयात जूनपासून उपचार सुरु होते. आठ दिवसांत बरे होणाऱ्या आजारांवर तो अनेक महिने रुग्णालयात राहिला. ससून रुग्णालयात त्याचं राहणं आरामदायक होतं. कैदी असताना त्याला सिगरेट मिळत होती.
ललितला भेटायला त्याच्या मैत्रिणी येत होत्या. हॉटेलमध्ये तो पाहिजे तेव्हा जात होता. भूषण पाटील, अभिषेक बलकवडे आणि प्रज्ञा कांबळे हे तिघेही अनेकदा ससून हॉस्पिटल आणि लेमन ट्री हॉटेलमध्ये ललित पाटील याला भेटले असल्याचंं समोर आलं आहे.
थोडक्यात बातम्या-