छगन भुजबळांना मोठा धक्का; मनोज जरांगेंच्या नादाला लागणं महागात पडलं?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नाशिक | अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना येवल्यात मोठा धक्का बसला आहे. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्याने भुजबळांना मोठा धक्का बसला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी भुजबळांची साथ सोडली आहे. जयदत्त होळकर हे भुजबळांचे खंदे समर्थक आहेत. त्यांनीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांची साथ सोडल्याने भुजबळांच्या अडचणी वाढल्या आहेत.

होळकर हे लासलगाव येथील मराठा तरुण नेतृत्व असून, सरपंच ते लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदापर्यंत त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. मंत्री भुजबळ हे येवला मतदार संघात विधानसभेच्या निवडणुकीत असल्यापासून होळकर भुजबळांचे समर्थक आहेत.

लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीत होळकर यांनी भुजबळांच्या नेतृत्वाखालील पॅनलचं नेतृत्वही केलं आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ हे आरक्षणाला विरोध करीत असल्याची भावना असल्याने त्यांना मराठा समाजाकडून विरोध होत आहे. त्यातून होळकर यांनी भुजबळांची सोडली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा ओबीसीत समाजात समावेश करण्याची आणि मराठ्यांना आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली आहे. जरांगे पाटील यांच्या या मागणीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे.  छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोपांचे शितयुद्ध देखील रंगलं. आता मात्र हे प्रकरण भुजबळांच्या चांगलंच अंगलट आल्याचं दिसतंय.

महत्त्वाच्या बातम्या-