“कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा समाजासाठी जिवाचं रान करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) गेले काही दिवस आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला कुणबीचं जातप्रमाणपत्र द्या, अशी मागणी वारंवार जरांगे पाटील करत आहेत. मात्र दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी असं काही वक्तव्य केलंय ज्यामुळे नविन वादाला तोंड फुटलं आहे.

96 कोळी मराठा आणि कुंबी प्रमाणपत्रावरुन राणे वादाच्या भवऱ्यात!

राणे म्हणाले की, “96 कुळी आणि कुणबी मराठा वेगळा आहे. कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मीही आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे समाजात असंतोष निर्माण झाला. राणे यांनी विरोध केल्यानंतर जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारकडे कित्येकवेळा मागणी केली. या शिवाय जरांगे पाटील यांनी 2004 च्या सरकारच्या जीआरचा आधार घेतलाय. ज्यात मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा असा उल्लेख आहे. मात्र मराठा वेगळे आणि कुणबी वेगळे आहेत, असं नारायण राणे म्हणालेत. 

 2004 मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारनं काढलेल्या जीआरमध्ये म्हटलंय की, कुणबी, पोट जाती- लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार यांना ओबीसीतून आरक्षण मिळतंय.

थोडक्यात बातम्या-