‘नवीन जोडप गेलं तर त्यांनी काय पकडापकडी खेळायची का?’; राज ठाकरे संतापले

पुणे | मी राज्यातील एका सर्किट हाऊसला गेलो होतो. तिथे एवढा मोठा बाथरूम पाहिला. तिथे काय पळत पळत जाऊन आंघोळ करायची आहे का? कशाला हवा एवढा बाथरूम. त्यानंतर दुसऱ्या एका सर्किट हाऊसला गेलो. तिथे हॉल प्रचंड मोठा होता. तिथे एक पलंग ठेवला होता. तिथे नवीन जोडप गेलं तर त्यांनी काय पकडापकडी खेळायचीय का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

माझ्या हातात उद्या सत्ता आली तर महाराष्ट्राचं प्लॅनिंग करण्याची जबाबदारी मी आर्किटेक्चरकडे देईन. माझा शब्द हा शब्द असतो. मी उद्या इंजीनिअरच्या कार्यक्रमाला गेलो तरी तुमचंच नाव घेईल. तिकडे गेलो म्हणून त्यांचं नाव घेणार नाही. मी इतर राज्यकर्त्यांसारखा नाही, असं राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सांगितलं.

राजाला सौंदर्यदृष्टी असेल तर खाली त्याचं संचित होतं. आपल्याकडे महानगर पालिकांकडे टाऊन प्लॅनिंग नाही. इंजिनीयरला जेवढं पालिकेत महत्त्व आहे. तेवढं आर्किटेक्चरला नाही, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणालेत.

दरम्यान, आपल्याकडे प्रदूषण बेसुमार वाढलं आहे. हाजी अलीला समुद्र राहिला नाही. काल परवा बातमी वाचली, मुंबईत सर्वाधिक प्रदूषण आहे. मी पुण्यात अनेकदा सांगितलंय. मुंबईची वाट लागायला एक काळ लोटला. पुण्याची वाट लागायला वेळ लागणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-